लसीकरण मोहिमला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:34 AM2021-04-11T04:34:34+5:302021-04-11T04:34:34+5:30
सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयातदेखील लस उपलब्ध नाही. तीन दिवसापूर्वी १३९० इतका लससाठा याठिकाणी उपलब्ध होता. तर चार ...
सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयातदेखील लस उपलब्ध नाही. तीन दिवसापूर्वी १३९० इतका लससाठा याठिकाणी उपलब्ध होता. तर चार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ७५० लस उपलब्ध होत्या. तालुक्यातील १०४ गावांना लसीकरण करायचे असल्यास मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध असणे आवश्यक आहे. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही ठराविक गावात लसीकरण करण्यात येत आहे. लस नसल्याने हे लसीकरण बंद करण्याची वेळ उद्यापासून येणार आहे. सिंदखेड राजा शहरातील जवळपास तीन हजार नागरिकांनी लस टोचून घेतली आहे. पण याचा वेग वाढविण्याची गरज असताना लस उपलब्ध होत नसल्याने मोठी अडचण होणार आहे.
रेमिडीसिवर इंजेक्शन मिळेना
येथील एका खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील अनेक रुग्णांना याचा लाभ होत आहे. परंतु रेमिडीसिवर इंजेक्शन येथेही मिळत नसल्याने रुग्णांना जालना येथील मोठ्या रुग्णालयात जावे लागत आहे. यासाठी पैसा आणि वेळ दोन्ही खर्च होत आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तथा सरपंच नितीन शेळके यांनी रेमिडीसिवर इंजेक्शन उपलब्ध व्हावे, अशी मागणी केली आहे.