५२ वर्षांची परंपरा खंडीत : श्री गजानन महाराज संस्थानची पायदळवारी रहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 04:05 PM2020-06-12T16:05:19+5:302020-06-12T16:08:41+5:30
. श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने आषाढी वारी गेल्या ५२ वषार्पासून सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव: जगात सर्वत्र कोरोना विषाणू संक्रमनाचा हाहाकार आहे. अशा प्रसंगी अडचणी लक्षात घेत, श्री गजानन महाराज संस्थान शेगावकडून यावर्षी पालखी सोहळा रहीत करण्यात आला आहे.
श्री क्षेत्र पंढरपूर येथे संस्थानची कायम शाखा झाली आहे. तेथे श्रींच्या मुर्तिची प्राणप्रतिष्ठा होवून नित्य पुजा - अर्चा , सोपस्कार व नियमाप्रमाणे कार्यक्रम केल्या जातात. पंढरीनाथाच्या चरणीही नित्य सेवा भक्तीभावाने कायम होत आहे. त्यामुळे अशा प्रसंगी श्री पालखी (श्री पादुका ) पंढरपूरास नेणे उचित ठरणार नाही, त्यामुळे पालखी सोहळा रहीत करण्यात आल्याचे संस्थान कडून सांगण्यात येते. श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने आषाढी वारी गेल्या ५२ वषार्पासून सुरु आहे. त्यानुसार आषाढी एकादशीच्या वारीचे नियोजन दरवर्षी करण्यात येत असते. श्री गजानन महाराजांच्या पंढरपूरच्या पायी वारीवरही या संसर्गजन्य आजाराचे सावट आहे. त्यामुळे २८ मे रोजी निघणारी श्रींचीपालखी रहित करण्यात आली आहे. मात्र सद्यस्थितीत देशभरात कोरोना विषाणूची लागण झाल्याने सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे पंढरपूरच्या आषाढीवारी बाबत संपुर्ण महाराष्ट्रातील विविध संस्थांनांच्या पालख्या , दिंड्या व वारकऱ्यांचे वारीचा निर्णय झालेला आहे. त्याअनुषंगाने श्रीगजानन महाराज संस्थान द्वारा पंढरपूर वारी बाबत प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे. (तालुका प्रतिनिधी)