लाचेची मागणी; महिला पुरवठा निरीक्षकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 04:42 PM2019-06-28T16:42:54+5:302019-06-28T16:43:02+5:30
तालुका पुरवठा निरीक्षक मनिषा मांजरखेडे यांच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
मेहकर: स्वस्त धान्य दुकानाचा तपासणी अहवाल अनुकूल देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तहसिलमधील नायब तहसिलदार तथा तालुका पुरवठा निरीक्षक मनिषा मांजरखेडे यांच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी देऊळगाव साखरर्शा येथील स्वस्थ धान्य दुकानदार अमरचंद बेगानी यांनी या संदर्भात बुलडाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. दरम्यान, दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली. दरम्यान, सध्या स्थानिक विश्रामगृहावर या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कारवाईनंतरचे सोपस्कार पूर्ण करीत असून लाच मागणाºया महिला पुरवठा निरीक्षक मनिषा मांजरखेडे या सध्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात आहे.