वधूपित्याला ५० हजार रुपयांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:36 AM2021-05-21T04:36:44+5:302021-05-21T04:36:44+5:30
जिल्ह्यात वाढता कोरोना प्रादुर्भाव बघता जिल्हाधिकाऱ्यांनी काही कडक निर्बंध घातले आहेत. त्यामध्ये लग्न समारंभात २५ पेक्षा अधिक लोक जमवू ...
जिल्ह्यात वाढता कोरोना प्रादुर्भाव बघता जिल्हाधिकाऱ्यांनी काही कडक निर्बंध घातले आहेत. त्यामध्ये लग्न समारंभात २५ पेक्षा अधिक लोक जमवू नये, जमलेल्या पंचवीस लोकांमध्ये सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर, मास्क लावणे आदी बाबींचे पालन करणे आवश्यक आहे. २० मे रोजी धोंडूसिंग बावरे यांच्या मुलीचा शहरातील बायपासजवळील महादेव मंदिर परिसरात लग्न समारंभ होता. त्यांनी २५ पेक्षा अधिक लोक जमवल्याचे नगरपरिषद प्रशासनाला कळाले. त्यानुसार नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षभरातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. नगरपालिकेच्या पथकामध्ये मुख्याधिकारी निवेदिता घारगे आणि नगरपरिषद कर्मचारी तर पोलीस पथकामध्ये बसवराज तम शेट्टे, पोलीस उपनिरीक्षक, विजय किटे, केशव मूळे, शिवानंद केदार आदींनी संयुक्त कारवाई केली.