बोराळा येथील पूल खचला
By admin | Published: August 13, 2015 12:07 AM2015-08-13T00:07:13+5:302015-08-13T00:07:13+5:30
जळगाव जामोद तालुक्यातील बोराळा बु. व बोराळा खु. दरम्यान वाहतूक बंद.
जळगाव जामोद (जि. बुलडाणा) : तालुक्यातील आदर्श ग्राम बोराळा येथील दोन गावांच्या मधोमध असलेला मोठा पुल गेल्या आठवड्यात झालेल्या अतवृष्टी आणि पुरामुळे वाहून गेल्याने दोन्ही गावादरम्यान तसेच काजेगाव जाणारी वाहतुक बंद झाली आहे. बोराळा खुर्द आणि बोराळा बु. या दोन गावांच्या मध्ये ८/१0 वर्षापुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुल बांधला हा पुल गेल्या आठवड्यात नदीला आलेल्या मोठय़ा पुरामुळे खचुन वाहून गेला. आतापर्यंंत हा पुल दोन वेळा खचला. दोन्ही गावांना साधणारा हा पुल खचल्याने दोन गावातील संपर्क तुटला आहे. तर पुढे जाणारा काजेगाव रस्ताही बंद झाला आहे. हा पुल एकदम उतारावर असल्याने अनोळखी माणुस एखादेवेळी भरधाव मोटारसायकल घेवून आल्यास याठिकाणी नकळत अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा सदर पुलाचे बांधकाम तात्काळ करून गावकर्यांना हा पुल मोकळा करून द्यावा, अशी मागणी बोराळा बु., बोराळा खुर्द आणि काजेगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.