अलिशान कार घ्यायचीय पैसे आण...; विवाहितेचा छळ, ९ जणांवर गुन्हा

By अनिल गवई | Published: January 9, 2024 05:32 PM2024-01-09T17:32:22+5:302024-01-09T17:32:42+5:30

आलिशान कार विकत घेऊन देण्यासाठी विवाहितेचा छळसासरकडील नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

Bring money to buy a luxury car...; Harassment of married, crime against 9 persons | अलिशान कार घ्यायचीय पैसे आण...; विवाहितेचा छळ, ९ जणांवर गुन्हा

अलिशान कार घ्यायचीय पैसे आण...; विवाहितेचा छळ, ९ जणांवर गुन्हा

खामगाव: आलीशान गाडी खरेदी करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावत घाटपुरी माहेर असलेल्या एका विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या नऊ जणांविरोधात विविध कलमान्वये शिवाजी नगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, मनिषा सुहास खरात रा. रिद्धीसिध्दी पार्क सोसायटी, पंचरत्नद्वार पखाडी, खारेगाव कळवा ठाणे, ह.मु. गजानन नगर घाटपुरी या विवाहितेने शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली की, तिचे लग्न ठाणे येथील सुहास यांच्यासोबत झाले. लग्नानंतर सासरच्या मंडळीने सुरूवातीचे काही दिवस चांगले वागविले. मात्र, त्यानंतर वेळोवेळी विविध कारणाने तिचा छळ करण्यात आला. अशातच आलिशान गाडी खरेदी करण्यासाठी माहेरवरून पैसे आणण्यासाठी तिचा शारिरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला.

या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलीसांनी पती सुहास अशोक खरात, सासरा अशोक गंगाराम खरात, सासू गंगावती अशोक खरात, जेठ संतोष अशोक खरात, जेठाणी तृप्ती संतोष खरात, नणंद मंगला पवन चंदनकर, नंदोई पवन चंदनकर सर्व रा. रिध्दीसिध्दी पार्क सोयायटी ठाणे, नणंद मनिषा अमोल भोसले, नंदोई अमोल भोसले रा. कळंबवली नवी मुंबई यांच्याविरोधात भादंवि कलम ४९८ अ, ३२३, ५०४, ३४ भादंवि नुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी महिला तक्रार कक्षात आपसी समजोता न झाल्यामुळे शिवाजी नगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे पोहेकॉ दिनेश घुगे करीत आहेत.

Web Title: Bring money to buy a luxury car...; Harassment of married, crime against 9 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.