मेहकर तहसील कार्यालयामध्ये दलालांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:44 AM2020-12-30T04:44:09+5:302020-12-30T04:44:09+5:30

एक कोतवाल बुकाची नक्कल घेण्यासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे ४० रुपये लागतात. परंतु येथे ५०० ते ७०० रुपये मोजावे लागतात. निवडणूक ...

Brokers in Mehkar tehsil office | मेहकर तहसील कार्यालयामध्ये दलालांचा सुळसुळाट

मेहकर तहसील कार्यालयामध्ये दलालांचा सुळसुळाट

googlenewsNext

एक कोतवाल बुकाची नक्कल घेण्यासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे ४० रुपये लागतात. परंतु येथे ५०० ते ७०० रुपये मोजावे लागतात. निवडणूक विभागामध्ये दलालाचे प्रमाण वाढले असून याकडे तहसीलदारासह सर्वच अधिकारी दुर्लक्ष करताना दिसत आहेत. अधिकारी ही दलालांनी आणलेली कामे त्वरित करुन देतात. यामध्ये मात्र सामान्य जनताच भरडल्या जात आहे. त्यांना आर्थि́क भुर्दंड सहन करावा लागत आहे. मेहकर तहसील कार्यालयाला ग्रामपंचायत निवडणुकीमुळे यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. कोराेनाच्या पार्श्वभूमीवर कुठलेच नियम पाळले जात नाहीत. कोणाच्याही तोंंडाला मास्क बांधलेला नाही. संबंधित नक्कल विभागात सक्रिय असलेल्या दलालांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

तहसील कार्यालयामध्ये कोणत्याही विभागात पैशाची मागणी झाल्यास संबंधित व्यक्तीने माझ्याकडे लेखी तक्रार करावी.

संजय गरकळ, तहसीलदार मेहकर.

Web Title: Brokers in Mehkar tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.