राष्ट्रीय तलावारबाजी स्पध्रेत जिल्हय़ातील दोन खेळाडूंना कांस्य पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:23 AM2018-02-07T00:23:12+5:302018-02-07T00:23:26+5:30
चिखली: क्रीडा व युवक संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर शहर व महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहगड इन्स्टिट्युट सोलापूर येथे पार पडलेल्या १९ वर्षाआतील ६३ व्या शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पध्रेत प्रणाली करंडे व वैष्णवी वायाळ या दोन खेळाडूंनी कांस्य पदक पटविले.
लोकमत न्यूज नेटवर्क

३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान आयोजित या स्पध्रेत १६ राज्यांतील एकूण ४00 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये जिल्हय़ातील प्रणाली प्रकाश करंडे हिने ईपी या खेळ प्रकारात वैयक्तिक कांस्यपदक तर वैष्णवी दत्तात्रय वायाळ हिने सॅबर या खेळप्रकारात सांघिक कांस्यपदक मिळविल्याने या दोन्ही खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर तलवारबाजी स्पध्रेचा मार्ग सुकर झाला आहे. या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, भारतीय तलवारबाजीचे अशोक दुधारे, महाराष्ट्र सचिव डॉ. उदय डोंगरे, जिल्हाध्यक्ष शिवाजीराजे जाधव, सचिव शेषनारायण लोढे, प्रशिक्षक अक्षय गोलांडे, वैभव लोढे, भुमकर, अजय त्रिभूवन, o्रीराम निळे यांनी समाधान व्यक्त केले.