भाऊ आम्हाला रेमडेसिविर द्या हो..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:36 AM2021-04-09T04:36:38+5:302021-04-09T04:36:38+5:30

चिखली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेमिडेसिव्हर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. हे इंजेक्शन अन्न व औषध प्रशासनाने विक्रेत्यांना १० टक्के नफा ...

Brother, give us remedivir ..! | भाऊ आम्हाला रेमडेसिविर द्या हो..!

भाऊ आम्हाला रेमडेसिविर द्या हो..!

Next

चिखली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेमिडेसिव्हर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. हे इंजेक्शन अन्न व औषध प्रशासनाने विक्रेत्यांना १० टक्के नफा घेऊन विकण्याचे आदेश दिले. मात्र, रेमडेसिविरचा तुटवडा असल्याने शहरातील शासकीय कोविड सेंटरसह खासगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या ५० टक्के रूग्णांना हे इंजेक्शन मिळेनासे झाले आहे. इंजेक्शन विक्रीत नफेखोरी वाढली असल्याने 'भाऊ आम्हाला रेमडेसिविर द्या हो...!', अशी आर्त हाक कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांकडून दिली जात आहे.

चिखली शहरात आजरोजी शासनाच्या अधिकृत आकेडवारीनुसार १३१८ कोरोना रूग्ण आहेत. यातील काही रूग्णांवर अनुराधा कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तर खासगी रूग्णालयात सुमारे ४४८ सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील गंभीर रूग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाल्याने रूगणांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत. शहरातील एकूण रूग्णसंख्या व त्यातील गंभीर रूग्णांची गरज पाहता शहरातील विविध मेडिकल दुकानांमध्ये केवळ ५० टक्के इंजेक्शन उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध मेडिकलमध्ये असलेला कमी साठा आणि वाढती मागणी, यामुळे कोरोना रूग्णांचे नातेवाईक पायांना अक्षरश: भिंगरी लावून विविध फार्मसी स्टोअरर्समध्ये चकरा मारत आहेत. त्यांना प्रत्येक ठिकाणी निराशा हाती येत आहे.

सर्व मेडिकल फिरूनही निराशा

'भाऊ काही करा...पण मला दोन इंजेक्शन मिळवून द्या... माझी बायको व मुलगा अ‍ॅडमिट आहेत... डॉक्टरने अर्जंट इंजेक्शन आणा, म्हणून सांगितले आहे; पण, कोणत्याच मेडिकलमध्ये मिळत नाही...'' हे काळजाचा ठाव घेणारे शब्द शेलूद येथील कोरोना रूग्णाच्या नातेवाईकाचे आहेत. त्यांची ५५ वर्षीय पत्नी व ३२ वर्षांचा मुलगा शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार घेत असून त्यांना शहरात सर्व मेडिकल फिरूनही निराशा हाती होती.

अन् केवळ १९२ इंजेक्शनचा पुरवठा !

चिखली शहरातून सुमारे १४०० इंजेक्शनची मागणी असताना ८ फेब्रुवारी रोजी केवळ १९२ रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा एका होलसेलरला नागपूरहून प्राप्त झाला. या प्राप्त साठ्यातून गंभीर व अत्यावश्यक रूग्णांची सर्व कागदपत्रे पडताळून गरजेनुसार इंजेक्शन पुरविले जात होते. दरम्यान मागणीसाठी नागरिकांची होत असलेली धावपळ व इंजेक्शनचा अत्यल्प साठा पाहता सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

आमच्या रूग्णांवर शहरातील एका दवाखान्यात उपचार सुरू आहेत. मात्र, कुठेच इजेक्शन मिळाले नाही, शेवटी काही ओळखीच्या माणसांकडे विचारपूस केली असता बुलडाण्यात इंजेक्शन असल्याचे कळाले, तेथून मोठ्या कष्टाने व विनंत्या करून इंजेक्शन आणावे लागले.

नारायण इंगळे रूग्णाचे नातेवाईक.

चिखली शहरातील एकूण रूग्णसंख्येच्या तुलनेत सुमारे ५० टक्के रूग्णांसाठी रेमडेसिविर मिळणे दुरापास्त झाले आहे. याकडे एफडीएने लक्ष देणे गरजेचे आहे. स्टॉक संपल्याशिवाय नवीन दर लागू करू नये.

डॉ.सुहास तायडे,

अध्यक्ष, आयएमए चिखली.

रेमडेसिविरची गरज पाहता सर्व होलसेलर व रिटेलर साठ्याकडे लक्ष देवून आहोत. यातील केवळ एका होलसेलरकडे १९२ व्हाईल्स् आज सकाळी उपलब्ध झाल्या होत्या. त्यांचे गजर व प्राथमिकता पाहता तातडीने वितरण केले आहे. बाकी इतरांकडे नागपूर डोपोतून अद्याप काहीच आलेले नाही. मागणीच्या तुलनेत मिळालेले व्हाईल अत्यंत कमी असल्याने जिल्ह्याला जास्तीत जास्त इंजेक्शन उपलब्ध व्हावेत, यानुषंगाने कसोसीने प्रयत्न चालू आहेत.

गजानन घिरके, औषध निरिक्षक.

Web Title: Brother, give us remedivir ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.