बीएसएनएलची सेवा विस्कळीत; ग्राहक त्रस्त

By admin | Published: July 20, 2014 01:18 AM2014-07-20T01:18:31+5:302014-07-20T02:03:40+5:30

बुलडाणा जिल्हात बीएसएनएलची सेवा विस्कळीत

BSNL service disrupted; The client is in trouble | बीएसएनएलची सेवा विस्कळीत; ग्राहक त्रस्त

बीएसएनएलची सेवा विस्कळीत; ग्राहक त्रस्त

Next

पळशी बु.: येथे भारत दूर संचार निगम लिमीटेड कंपनीच्या गलथान कारभारामुळे मोबाईल टावर वारंवार बंद पडत असल्याने परिसरातील ग्राहक त्रस्त होत आहे.
गावालगतच्या शेतात गेल्या ५ ते ६ वर्षापुर्वी भारत दूरसंचार निगम लिमीटेड या कंपनीच्या माध्यमातून हजारो रूपये खर्च करून मोठे मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहे. मात्र हे टॉवर गेल्या वर्षभरापासून कधी विजेच्या लपंडावामुळे तर कधी बॅटरी कमजोर झाल्यामुळे वारंवार बंद पडते. त्यामुळे परिसरातील ग्राहक त्रस्त झाले आहेत.
गेल्या ११ जुलै रोजी या टॉवरवरून भ्रमणध्वनी व इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने येथील स्टेट बँकेतील व्यवहार ठप्प झाला होता. टॉवर झाल्याने परिसरातील अनेकांनी बीएसएनएलची सेवा घेतली. मात्र ही सेवा विस्कळीत राहत असल्याने ग्राहकात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या बाबीकडे लक्ष देवून येथील मोबाईल टावरच्या बॅटरी दूरूस्त करून साफसफाई करणे तसेच बँकेची सेवा सुरळीत करून देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील ग्राहकाकडून होत आहे.

Web Title: BSNL service disrupted; The client is in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.