विवेकानंद आश्रमात बुध्द जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:36 AM2021-05-27T04:36:05+5:302021-05-27T04:36:05+5:30
जगातील सर्व दुःखांचा नाश व्हावा व प्रत्येक जीव सुखाने जगावा, मानवजातीने प्रज्ञा, शील, करुणेचा अंगीकार करावा, हा महान संदेश ...
जगातील सर्व दुःखांचा नाश व्हावा व प्रत्येक जीव सुखाने जगावा, मानवजातीने प्रज्ञा, शील, करुणेचा अंगीकार करावा, हा महान संदेश देणाऱ्या भगवान बुध्दांची शिकवण आजही जगासाठी महत्त्वाची आहे, असे विचार युगप्रवर्तक स्वामी विवेकानंदांनी काढले होते. प. पू. शुकदास महाराजश्रीं यांच्या मानवसेवेत भगवान बुध्दांची शिकवण जाणवते म्हणून विवेकानंद आश्रमात भगवान बुध्दांच्या दोन भव्य मूर्तीची, प्रतिमांची स्थापना केल्याचे दिसून येते. बुधवारी विवेकानंद आश्रमातील भव्यदिव्य भगवान बुद्धांच्या प्रतिमांचे पूजन आश्रमाचे अध्यक्ष रतनलाल मालपाणी, आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, नितीन इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विश्वस्त पुरुषोत्तम आकोटकर, पोलीसपाटील रवि घोंगडे, विवेक पाटील लहाने, अभिषेक आकोटकर, छगन साळवे, सोपान वायाळ आदी उपस्थित होते.