बुलडाण्यातील जिजामाता महाविद्यालय परिसरात व्यापारी संकुल बांधा - विजयराज शिंदे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 10:10 PM2017-12-03T22:10:21+5:302017-12-03T22:17:42+5:30

जिजामाता महाविद्यालयाच्या चारही बाजूने व्यापारी संकुल बनवून शहरातील बेरोजगार युवक व अतिक्रमण धारकांना स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याची मागणी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष आणि संपूर्ण संचालक मंडळ यांच्या कडे केली.

Build a business complex in Jijamata College area - Vijayraj Shinde | बुलडाण्यातील जिजामाता महाविद्यालय परिसरात व्यापारी संकुल बांधा - विजयराज शिंदे 

बुलडाण्यातील जिजामाता महाविद्यालय परिसरात व्यापारी संकुल बांधा - विजयराज शिंदे 

Next
ठळक मुद्देव्यापारी संकुल बांधून बेरोजगार युवकांना स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याची मागणी अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी दिले अभिवचन 

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  बुलडाणा शहरातील जिजामाता महाविद्यालयाची चारही बाजूंची जागा व्यावसायिक दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असून महाविद्यालयाच्या चारही बाजूने व्यापारी संकुल बनवून शहरातील बेरोजगार युवक व अतिक्रमण धारकांना स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याची मागणी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष आणि संपूर्ण संचालक मंडळ यांच्या कडे केली. यावेळी अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख  यांनी परवानगी मिळाल्यास नक्कीच व्यापारी संकुल बनविण्याचे अभिवचन दिले.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचित संपूर्ण संचालक मंडळ व अध्यक्ष हे बुलडाणा जिजामाता महाविद्यालय परिसरात उभारले मुलींच्या वसतिगृह लोकार्पण सोहळ्याकरिता   आले होते. याच दिवशी अध्यक्ष व संचालक मंडळाने माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या निवासस्थानी संदिच्छा भेट दिली होती. व्यापारी संकुल उपलब्ध झाल्यास  शहरातील सुशिक्षित बेरोजगार व अतिक्रमण धारकांच्या व्यवसायाचा कायमस्वरूपी प्रश्न सुटून शहर सौंदर्यीकरण होऊन जिजामाता महाविद्यालयास कायमस्वरूपी दरमहा कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. ह्या मिळण-या उत्पन्नातुन शैक्षणिक सुविधेवर खर्च होऊन विद्यार्थ्यांना सुद्धा शैक्षणिक दृष्टीने फायदा होणार आहे. अशा तिहेरी फायद्याचा त्रिवेणी संगम घडवणाºया व्यापारी संकुल बनविण्याची मागणी विजयराज शिंदे  यांनी करताच संचालक मंडळाने देखील या मागणीवर विचार करण्याचे सांगितले. या मागणी सोबतच दर्जेदार व कॉपीमुक्त शिक्षणाचे दालने सगळीकडे उघडावी यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा विदर्भाव्यतिरिक्त मराठवाडा व खान्देश मध्ये ही विस्तार करावा अशीही मागणी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी यावेळी केलेली आहे.

Web Title: Build a business complex in Jijamata College area - Vijayraj Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.