आंतरराष्ट्रीय सायकलपटू तयार करणार

By admin | Published: August 19, 2015 01:47 AM2015-08-19T01:47:11+5:302015-08-19T01:47:11+5:30

बुलडाणा येथे श्री छत्रपती पुरस्कारप्राप्त पवार यांची माहिती

To build an international cyclist | आंतरराष्ट्रीय सायकलपटू तयार करणार

आंतरराष्ट्रीय सायकलपटू तयार करणार

Next

बुलडाणा : प्रत्येक जिल्ह्यात सायकल स्पर्धा मोठय़ा प्रमाणात घेण्यात येवून आंतरराष्ट्रीय सायकलपटू तयार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन श्री छत्रपती पुरस्कारप्राप्त तथा महाराष्ट्र सायकल असोसिएशनचे सचिव सूर्यकांत पवार यांनी केले. स्थानिक विश्रामभवनात १८ ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी असोसिएशनतर्फे पुढील वर्षात होणार्‍या स्पर्धांची माहिती दिली. तसेच सायकलींग असोसिएशनचा प्रचार करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सायकल रॅली काढण्यात येवून ज्या ज्या ठिकाणी सायकल रॅलीचा थांबा असेल त्या ठिकाणी पाच हजार विद्यार्थ्यांना सायकलींग रॅलीमध्ये सहभागी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र सायकल असोसिएशन ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सायकलपटू तयार करण्यासाठी प्रयत्न करणार असून, शासनामार्फत होणार्‍या संपूर्ण स्पर्धांचे नियोजन करणार असल्याची माहिती दिली.

Web Title: To build an international cyclist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.