महिलांच्या सन्मानासाठी तरी शौचालय बांधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 08:03 PM2017-10-05T20:03:12+5:302017-10-05T20:03:45+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा अभियान व्यापक प्रमाणात राबविण्यात आले. १५ सप्टेंबर ते २ आक्टोबर दरम्यान राबविण्यात आलेल्या या अभियानाची सांगता खामगाव तालुक्यातील वरणा या अभियाना दरम्यान हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतीत झाली. या प्रसंगी किमान आपल्या घरातील महिलांच्या सन्मानासाठी तरी शौचालय बांधा असे आवाहन पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क

स्वच्छता ही सेवा अभियान जिल्ह्यात व्यापक प्रमाणात राबविण्यात आले. या सर्व स्तरावरील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था, तसेच विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी व गावकºयांचा यांचा सक्रिय सहभाग लाभला. मुख्य कार्यकारी अधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या मार्गदर्शनात अभियानादरम्यान उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. त्यामध्ये जिल्हा तसेच तालुका स्तरावरील कार्यशाळा, परीसर स्वच्छता, श्रमदान, सफाई कामगारांचा सत्कार, गृहभेटी, शौचालय बांधकामासाठी लोकांना प्रवृत्त करणे , श्रमदानातून शौचालयाचे खड्डे खोदने आदी सर्व उपक्रम राबविले.
पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियानाची खामगाव तालुक्यात वरणा या ग्रामपंचायतीत कार्यक्रम आयोजित करून सांगता करण्यात आली. ही ग्रामपंचायत अभियान दरम्यान हागणदारीमुक्त झाली. याप्रसंगी आमदार आकाश फुंडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून आपला तालुका लवकरात लवकर हागणदारीमुक्त करावा असे प्रतिपादन केले. इतर ग्रामपंचायतीनी ही वरणा या ग्रामपंचायत चा आदर्श घेवून आपल्या ग्रामपंचायती लवकर हागणदारीमुक्त करून तालुका डिसेंबर अखेरपर्यंत हागणदारीमुक्त करण्याच्या सूचना दिल्या. या कार्यक्रमास पंचायत समिती सभापती, सदस्य यांचीही उपस्थिती लाभली. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी चोपडे, नरेगा गटविकास अधिकारी राजपुत, गटविकास अधिकारी शिंदे, सहायक गटविकास अधिकारी जाधव तसेच पंचायत समिती चे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, गट संसाधन केंद्राचे कर्मचारी यांनी केले.