बुलडाणा नगर परिषद कार्यक्षेत्रातील बांधकाम परवानगी आता आॅनलाईन पध्दतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 01:37 PM2017-11-20T13:37:00+5:302017-11-20T13:37:49+5:30
बुलडाणा : नगर परिषद बुलडाणाच्या कार्यक्षेत्रातील बांधकाम परवानगीसुध्दा आता आॅनलाईन पध्दतीने करण्यात येणार असून यापूर्वी लागणाºया वेळामध्ये वेळेची बचत होणार आहे.
बुलडाणा : डिजीटल इंडिया अंतर्गत आपले सरकार या शासकीय पोर्टल मार्फत
जास्तीत जास्त सेवा या नागरिकांना मिळत आहे. बुलडाणा जिल्हा हा डिजीटल
इंडियाच्या मार्फत पेपरलेस करून आॅनलाईन सुविधाच्या माध्यमातून शहरातील
नागरिकांना सुविधा देण्याचा शासनाचा आणि नगर परिषद बुलडाणाचा मानस आहे.
याचाच एक भाग म्हणून आता नगर परिषद बुलडाणाच्या कार्यक्षेत्रातील बांधकाम
परवानगीसुध्दा आता आॅनलाईन पध्दतीने करण्यात येणार असून यापूर्वी
लागणाºया वेळामध्ये वेळेची बचत होणार आहे. त्याअंतर्गत परवानगीसाठी या
प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी
केले आहे.
माहिती तंत्रज्ञान विभाग महारार्ष्ट शासन व नगर परिषद यांच्या संयुक्त
विद्यमाने बुलडाणा जिल्ह्यातील सर्व नगर परिषदचे अध्यक्ष, मुख्याधिकारी,
नगर अभियंता, शहर अभियंता त्याचप्रमाणे घर बांधकाम करणारे अभियंता या
सर्वांची कार्यशाळा नगर परिषद सभागृह बुलडाणा येथे आयोजित करण्यात आली
होती. या कार्यशाळेत नगराध्यक्षा नजमुन्नीसा मो.सज्जाद यांनी आधुनिक
तंत्रज्ञानाचा फायदा घेवून आधुनिकतेचा सर्व शहर वासीयांनी लाभ घ्यावा व
यामध्ये अभियंता यांची खुप महत्वाची भूमिका राहणार आहे. यामध्ये शहरातील
नागरिकांना वेळेत सुविधा प्राप्त होणार आहे ही शहर वासियांसाठी आनंदाची
बाब आहे. विजय जाभाये यांनी या नवीन प्रणालीचे स्वागत करून त्याचा वापर
करण्यासाठीचे आवाहन केले. सुरेश चौधरी यांनीसुध्दा या प्रणालीचा वापर
करण्यासाठी सर्व अभियंते नगर परिषद बुलडाणाला सहकार्य करण्याचे आश्वासन
दिले. माहिती तंत्रज्ञान विभाग महाराष्टÑ शासन यांचेकडून रितेश
क्षिरसागर, रघुनंदन राव यांनी उपस्थित सर्व अभियंता प्रशिक्षणार्थी यांना
नवीन तंत्रज्ञानची प्रणाली सविस्तर समजावून सांगितली.
या कार्यक्रमासाठी सिमाबाई ढोबे अध्यक्षा नगर परिषद जळगाव जामोद,
नगराध्यक्ष संग्रामपूर, दिपक सोनुने शिक्षण सभापती, नगरसेवक मो.सज्जाद,
अरविंद होंडे, याकुबसेठ, बबलू कुरेशी, नईम कुरेशी, योगेश देशमुख, बांधकाम
अभियंता राजू जाधव, इंजि.स्वप्नील राजपूत, संजय अहिर, शुभम जाधव,
राजेंद्र मुरेकर, दिलीप जोशी, फकीरा जाधव यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन महेंद्र सौभागे यांनी तर आभार प्रदर्शन योगेश देशमुख
नगर अभियंता यांनी केले. कार्यक्रमासाठी नगर परिषद मधील खाजगी बांधकाम
अभियंते उपस्थित होते. (प्रतिनिधी)