बुलडाणा @ ९१.३१ टक्के; १३१३ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत

By admin | Published: June 14, 2017 12:57 AM2017-06-14T00:57:50+5:302017-06-14T00:57:50+5:30

१५ शाळांनी दिला १०० टक्के निकाल : तीन शाळांचा निकाल ५० टक्क्यांच्या आत

Buldana @ 9.31 percent; 1313 in the student proficiency category | बुलडाणा @ ९१.३१ टक्के; १३१३ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत

बुलडाणा @ ९१.३१ टक्के; १३१३ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : दहावीच्या परीक्षेचा आॅनलाइन निकाल मंगळवार, १३ जून दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला असून, बुलडाणा तालुक्याचा निकाल ९१.३१ टक्के लागला आहे. तालुक्यातून ४५२१ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. तालुक्यातील एकूण ६३ शाळेपैकी १५ शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. मुलांचे पास होण्याचे प्रमाण ८९.४७ टक्के असून, मुलींची टक्केवारी ९४.०७ आहे.
शहरातील एडेड हायस्कूलचा निकाल ९०.५१ टक्के, भारत विद्यालय ९७.५०, प्रबोधन विद्यालय ९६.१०, श्री.शिवाजी विद्यालय ८६.५७, जि. प.हायस्कूल देऊळघाट ८४.२७, जि. प.हायस्कूल धाड ९०.९०, उर्दू हायस्कूल बुलडाणा ९२.३९, श्री शिवाजी विद्यालय रायपूर ९७.१४, श्री शिवाजी हायस्कूल मासरूळ ९५.३१, जि.प.हायस्कूल पाडळी १००, जि. प. हायस्कूल साखळी बु ६७.८१, जि.प. माध्यमिक कन्या शाळा बुलडाणा ७०, जनता विद्यालय पिंपळगाव सराई ९३.७५, श्री शिवाजी हायस्कूल चांडोळ ८८.४६, जि.प.हायस्कूल म्हसला बु. ७३.८६, पं.नेहरू विद्यालय अंभोडा ९४.८७, श्री शिवाजी हायस्कूल शिरपूर ८०.८५, जि.प.मुले हायस्कूल बुलडाणा १००, जिजामाता हायस्कूल दुधा ९०.३२, श्री शिंदे गुरूजी कन्या विद्यालय बुलडाणा ७१.४२, श्री शिवाजी विद्यालय भादोला ८८, शरद पवार हायस्कूल पांगरी ८०.३९, जि.प.उर्दू विद्यालय रायपूर ९८.३३, विद्या विकास, कोलवड १००, रूखाई मा.कन्या विद्यालय ९७.०५, शारदा ज्ञानपीठ, बुलडाणा १००, महात्मा फुले विद्यालय नांद्राकोळी ९४.५९, विवेकानंद विद्यालय सव ७७.६३, पवार हायस्कूल भडगाव ९०.५६, शरद पवार विद्यालय वरूड ९६.७७, चक्रधर स्वामी विद्यालय मढ ९६.६१, सेंट जोसेफ, सुंदरखेड १००, छत्रपती मा. विद्यालय सुंदरखेड ९७.३६, सहकार विद्या मंदिर बुलडाणा १००, शरद पवार विद्यालय सागवन २९.६२, श्री जगदंबा माध्य., इरला ९१.६६, मौ.आझाद उर्दू हायस्कूल धाड ९०.९०, राजर्षी मा. विद्यालय येळगाव १००, मौ.अबुल कलाम आझाद उर्दू, बुलडाणा ९३.३३, श्री नवनाथ मा.विद्यालय गुम्मी ९७.९१, स्व.भास्करराव शिंगणे विद्यालय वरवंड ९१.३०, स्व.भास्करराव शिंगणे विद्यालय चौथा ९५.७४, स्व.एस.एम.भास्करराव शिंगणे मा.विद्यालय डोमरूळ ९४, कलाबाई राजधरसिंग पवार मा. विद्यालय सातगाव म्हसला ९७.७२, राजे संभाजी विद्यालय डोंगरखंडाळा ९४.५९, राजीव गांधी मिलिटरी स्कूल बुलडाणा १००, मा. आश्रम शाळा पळसखेड नागो १००, श्री शिवाजी मा.विद्यालय हतेडी बु. ९८.४८, अनुदानित आदिवासी आश्रम शाळा येळगाव ३५.४१, सरस्वती विद्यालय सुंदरखेड १००, शरद पवार उर्दू हायस्कूल चांडोळ १००, अब्दुल अहमद उर्दू हायस्कूल ९३.६१, वंदे भारती विद्यालय धाड ८३.७२, श्री नागेश्वर मा. विद्यालय पाडळी ९२.५९, म.आझाद उर्दू हायस्कूल, ढालसावंगी १००, शा. मुले रहिवासी स्कूल कोलवड १००, सहकार विद्यामंदिर धाड १००, ज्ञानदीप मा. विद्यालय बुलडाणा ९५.१२, मातोश्री विद्या मंदिर मंडोळा १०० व राजश्री शाहू महाराज शाळा बुलडाणाचा निकाल ०० टक्के एवढा लागला.

Web Title: Buldana @ 9.31 percent; 1313 in the student proficiency category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.