बुलडाणा : साडेचार हजार शेतकऱ्यांचे आधार लिकींग बाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 02:34 PM2020-01-24T14:34:21+5:302020-01-24T14:34:28+5:30
जिल्ह्यातील चार हजार ६९३ शेतकऱ्यांचे आधार लिकींग अद्याप खात्याशी झालेले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील चार हजार ६९३ शेतकऱ्यांचे आधार लिकींग अद्याप खात्याशी झालेले नाही. त्यादृष्टीने यंत्रणा प्रयत्न करत आहे. दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून कर्ज घेतलेल्या एक लाख ५० हजार ४३९ शेतकºयांची एक हजार २८ कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे. जिल्ह्यातील शेतकºयांचा विचार करता सर्वाधिक कर्ज सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी शेतकºयांना दिले आहेत. त्यामुळे हा आकडा मोठा आहे.
राज्य शासनाने शेतकºयांचे दोन लाख रुपयापर्यंतचे सप्टेंबर २०१९ पर्यंतचे कर्ज माफ केले आहे. त्यानुषंगने ज्या शेतकºयांचे आधार कार्ड त्यांच्या खात्याशी लिंक नाही, अशा शेतकºयांचे आधाड कार्ड हे खात्याशी लिंक करण्याची मोहिमच जिल्ह्यातील बँकांनी हाती घेतली आहे. त्याबाबत राज्यस्तरावरून तसे निर्देश दिले गेले होते. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील दोन लाख ९४० शेतकºयांपैकी एक लाख ६३ हजार ६५३ शेतकºयांचे आधारकार्ड त्यांच्या खात्याशी लिंक करण्यात आले असून ३७ हजार २८७ शेतकºयांचे ते बाकी होते. त्यापैकी ३२ हजार ५९४ शेतकºयांचे आधार कार्ड प्रत्यक्ष खात्याशी लिंक करण्याची प्रक्रिया सुरू असून चार हजार ६९३ शेतकºयांचे आधार कार्ड अद्यापही त्यांच्या बँक खात्याशी लिंक झालेले नाही. यासंदर्भानेच कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात २२ जानेवारी रोजी सहकार सचिव आभा शुक्ला यांनी अमरावती येथे विभागातील सर्व जिल्हा उपनिबंधक, सहकारी बँकांचे अधिकारी, बँकर्स समितीचे सदस्य यांची एक कार्यशाळा घेऊन प्रत्यक्ष योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात त्यांना सविस्तर माहिती दिली.