बुलडाणा : शेतकर्‍यांद्वारा केळवद येथील महावितरणच्या कार्यालयात जाळपोळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 01:28 AM2017-12-27T01:28:25+5:302017-12-27T01:28:42+5:30

चिखली: ऐन हंगामात कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता महावितरणने शेतकर्‍यांचा वीज पुरवठा खंडित केल्याने २६ डिसेंबर रोजी संतप्त शेतकर्‍यांनी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात केळवद येथील महावितरणच्या कार्यालयातील साहित्याची जाळपोळ केली. दरम्यान, हे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता पाहता विद्युत वितरणने तातडीने शेतकर्‍यांचा विद्युत पुरवठा सुरळीत केला.

Buldana: Burns of the MSEDCL's office in Keelwad by farmers | बुलडाणा : शेतकर्‍यांद्वारा केळवद येथील महावितरणच्या कार्यालयात जाळपोळ 

बुलडाणा : शेतकर्‍यांद्वारा केळवद येथील महावितरणच्या कार्यालयात जाळपोळ 

Next
ठळक मुद्देराहुल बोंद्रे यांच्या आक्रमकतेने खंडित विद्युत पुरवठा झाला पूर्ववत

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: ऐन हंगामात कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता महावितरणने शेतकर्‍यांचा वीज पुरवठा खंडित केल्याने २६ डिसेंबर रोजी संतप्त शेतकर्‍यांनी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात केळवद येथील महावितरणच्या कार्यालयातील साहित्याची जाळपोळ केली. दरम्यान, हे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता पाहता विद्युत वितरणने तातडीने शेतकर्‍यांचा विद्युत पुरवठा सुरळीत केला.
महावितरणच्या केळवद कार्यालयांतर्गत असलेल्या केळवद, शिरपूर, किन्होळा, वाडी ब्रह्मपुरी, गिरोला, हातणी या गावातील शेतकर्‍यांचा विद्युत पुरवठा महावितरणने कोणतीही पूर्वसूचना न देता पाच दिवसांपासून खंडित केला होता. यामुळे या गावातील ऐन भरात आलेले गहू, हरभरा, तूर, मका, कांदा व भाजीपाल्याची पिके धोक्यात आली होती. तर उपरोक्त गावातील अनेक शेतकर्‍यांनी वीज बिल भरले असून, काहींना बिलेदेखील मिळालेली नाहीत, असे असताना महावितरणने अचानकपणे सरसकट कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित केल्याने उपरोक्त गावातील शेतकर्‍यांनी आ. राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात केळवद येथील कार्यालयावर धडक दिली असता तेथे कोणताही अधिकारी वा कर्मचारी उपस्थित नव्हते. दरम्यान, उशिराने येथे बुलडाणा येथून कार्यकारी अभियंता रामटेके उपस्थित झाले खरे; मात्र त्यांच्याकडूनही शेतकर्‍यांना दिलासा न मिळाल्याने शेतकर्‍यांनी संतापाच्या भरात केळवद येथील कार्यालयास आग लावली. दरम्यान, आ. बोंद्रे यांनी जोपर्यंत शेतकर्‍यांचा वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत एकाही अधिकारी, कर्मचार्‍यांना येथून हलू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतल्याने कार्यकारी अभियंता रामटेके यांच्या सूचनेवरून खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. 
यावेळी आ. बोंद्रे यांच्यासह संजय पांढरे, पं.स. सदस्य प्रभाकर वाघ, धाड सरपंच रीझवान सौदागर, रमेश सुरडकर, सरपंच निंबाजी सवडे, संजय गिरी, पिंटू गायकवाड, बाळू साळोख, राम जाधव, समाधान शेळके, नामदेव सदार, दीपक जाधव, दिलीप सुसर, अरुण शेळके, अशोक वानखेडे, संजय बाहेकर, भगवान राजपूत, शे. अन्सार, गणेश पांढरे, अशोक पाटील, सुनील पाटील, समाधान पाटील, अमोल कालेकर, सुभाष भोसले, नंदू बोरबळे, भगवान पांढरे, o्रीकृष्ण पाटील, समाधान हाडे यांच्यासह केळवद, शिरपूर, किन्होळा, वाडी ब्रम्हपुरी, गिरोला, कोलारी, हातणी आदी गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. 

उपकेंद्र जाळपोळप्रकरणी हरीश रावळ यांच्यासह आंदोलकांवर गुन्हे 
मलकापूर: तालुक्यातील जांबुळधाबा उपकेंद्रावरील खेडे विभागाची वीज गेल्या तीन दिवसांपासून बंद असल्याने संतप्त शेतकर्‍यांनी अँड. हरिश रावळ, राजू पाटील आदींच्या नेतृत्वात कार्यालयाची जाळपोळ केल्याने याबाबतची तक्रार ग्रामीण पोस्टेला कनिष्ठ अभियंता मराविवि खुपचंद उद्धवराव पवार यांनी दिली. यावरून ग्रामीण पोलिसांनी अँड. हरीश रावळ, राजू पाटील, गजानन ठोसर, बंडू चौधरी, विजय पाटीलसह अधिक ७ ते ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जाबुंळधाबा उपकेंद्रांतर्गत येणार्‍या खेडे विभागातील दहा रोहित्रांचा वीज पुरवठा तीन दिवसांपासून बंद असल्याने संतप्त नागरिकांसह त्यांनी ही जाळपोळ केली होती. वीज वितरणचे नुकसान केल्याप्रकरणी अँड. हरीश रावळ, राजू पाटील, गजानन ठोसर, बंडू चौधरी, ज्ञानेश्‍वर निकम, विजय पाटील, यांच्यासह सात ते आठ जणांविरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. भारतीय विद्युत अधिनियम १३८ सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कलम १४३, ४४८, ४३५, १८६ नुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत. जनसामान्यांच्या प्रश्नासंदर्भात आंदोलन केल्यानंतर असे गुन्हे दाखल होत असतील तर आपण माघार घेणार नाही. जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहू , अशी प्रतिक्रिया अँड. हरीश रावळ यांनी दिली. दरम्यान, दोन दिवसांपासून बुलडाणा जिल्हय़ात वीज वितरण विरोधात जनमानसात रोष दिसत असून, चिखली तालुक्यातील किन्होळा येथेही सलग दुसर्‍या दिवशी त्याचे प्रतिबिंब उमटले. येथेही काँग्रसचे चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांनी आक्रमक भूमिका घेत वीज वितरणच्या कार्यालयातील टेबल जाळला.

Web Title: Buldana: Burns of the MSEDCL's office in Keelwad by farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.