बुलडाणा, चिखली तालुक्यातील १५१ गावात पाणीटंचाई घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 01:24 AM2017-12-28T01:24:11+5:302017-12-28T01:25:04+5:30
बुलडाणा : डिसेंबर अखेरच बुलडाणा जिल्ह्यात टंचाईची दाहकता वाढली असून, बुलडाणा व चिखली तालुक्यातील १५१ गावात पाणीटंचाई घोषित करण्यात आली आहे. भूजल अधिनियमांचा आधार घेत ही टंचाई घोषित करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : डिसेंबर अखेरच बुलडाणा जिल्ह्यात टंचाईची दाहकता वाढली असून, बुलडाणा व चिखली तालुक्यातील १५१ गावात पाणीटंचाई घोषित करण्यात आली आहे. भूजल अधिनियमांचा आधार घेत ही टंचाई घोषित करण्यात आली आहे.
त्यामुळे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोताच्या ५00 मीटर अंतरामध्ये व्यक्ती तथा कोणत्याही प्रयोजनासाठी विहिरीचे खोदकाम करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने पुरविलेल्या माहितीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, असा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचा स्रोत दूषित होईल, अशी कोणतीही कृती केली जाऊ नये, असेही उपविभागीय अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
टंचाई कृती आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात मातला, दत्तपूर, सिंदखेड, गिरडा दुसर्या टप्प्यात वरवंड, भादोला, भडगाव, सावळा, शिरपूर, देऊळघाट, सुंदरखेड, पिंपळगाव सराई, म्हसला बु. माळविहीर, पळसखेड नागो, पळसखेड नाईक, सव, चांडोळ, गुम्मी, चौथा, रूईखेड मायंबा, घाटनांद्रा, ढासाळवाडी, बोरखेड धाड, चिखला, साखळी बु. हतेडी खु. डोंगरखंडाळा, कोलवड, धाड आणि तिसर्या टप्प्यात बिरसिंगपूर, हनवतखेड, जांब, पाडळी, उमाळा, दुधा, दहिद खु. कुंबेफळ, माळवंडी, रायपूर या गावांमध्ये पाणीटंचाई व पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना जारी करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकार्यांनी सांगितले.
दुसरीकडे चिखली तालुक्यातील ११0 गावात पाणीटंचाई घोषित करण्यात आली असून, भूजल अधिनियम येथे लागू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये वैरागड, पिंपरखेड, शेलगाव आटोळ, रानअंत्री, उंद्री, मेरा बु., चंदनपूर, दिवठाणा, अंचरवाडी, टाकरखेड हेलगा, धोत्रा भनगोजी, मालगणी, डोंगरशेवली, डासाळा, भालगाव, दुसर्या टप्प्यात किन्हाळा, अंबाशी, हरणी, मुरादपूर, धोत्रा नाईक, हिवरा नाईक, किन्ही नाईक, काटोडा, हातणी, धोडप, कोलारा, उत्रादा, पेठ, पाटोदा, कारखेड, हराळखेड, शेलसुर, सवणा, गोद्री, चांदई, खैरव, आंधई चांदई, सैलानीनगर, तांबुळवाडी, भोगावतीसह अन्य गावांचा समावेश आहे.