बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाची जप्ती तुर्तास टळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 03:59 PM2019-11-16T15:59:14+5:302019-11-16T15:59:25+5:30

भुसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकाºयांनी ३० दिवसांत रक्कम न्यायालयात भरण्याचे लेखी आश्वासन दिल्याने जप्तीची कारवाई टळली.

Buldana collector's office seize action avoided | बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाची जप्ती तुर्तास टळली!

बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाची जप्ती तुर्तास टळली!

Next

बुलडाणा : न्यायालयाने जमिनीचा वाढीव मोबदला देण्याचा निकाल देऊनही तो देण्यास  टाळाटाळ केल्याप्रकरणी मलकापूर न्यायलयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जप्तीचे आदेश काढण्यात आले. भुसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकाºयांनी ३० दिवसांत रक्कम न्यायालयात भरण्याचे लेखी आश्वासन दिल्याने जप्तीची कारवाई टळली. नांदूरा येथील दिवाणी न्यायालयाकरिता अजाबराव उत्तमराव देशमुख यांची ८९ आर जमीन संपादित करण्यात आली होती. संपादन करतांना मिळालेला मोबदला अल्प असल्याने त्यांनी वाढीव मोबदला मिळण्यासाठी न्यायालयात दाद मागितली होती. प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना अजाबराव देशमुख यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या वारसांनी प्रकरण पुढे चालवले. प्रकरणी वाढीव मोबदला देण्याचा निकाल २०१५ मध्ये मलकापूर न्यायालयाने दिला होता. परंतू वाढीव मोबदला रक्कम देण्यास शासनाकडून दिरंगाई होत असल्याने स्व. अजाबराव देशमुख यांच्या वारसांनी न्यायालयात  धाव घेतली.  अ‍ॅड. संजय जैन यांनी या प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालय जप्ती आदेश काढण्याची विनंती केली. याप्रकरणी यापूर्वीही मलकापूर उपविभागीय अधिकाºयांची खूर्ची जप्त केली होती. दिवाणी न्यायाधीश महेंद्र पाटील यांच्या जप्ती आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी बेलीफ शकिल अहेमदसह वादी किरणबापू देशमुख १५  नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात  पोहेचले. जिल्हाधिकारी बाहेरगावी दौºयावर होते. स्वीय सहाय्यक गौड, उपजिल्हाधिकारी देवरे, विधी अधिकारी अ‍ॅड. पदमने, मुख्य लिपीक    पाठक  यांनी मंत्रालयातील  विधी व न्याय विभागातील कक्षाधिकारी पाटील यांच्याशी व जिल्हा  न्यायालयातील प्रबंधक भारंबे, चाकोतकर यांच्याशी चर्चा केली. ३० दिवसांत त्रुटीची पुर्तता करुन वाढीव मोबदल्याचा निधी न्यायालयात भरण्याचे लेखी पत्र दिल्याने वादी किरणबापू देशमुख यांनी जप्ती तुर्त टाळण्यात येत असल्याचे लिहून दिले.

Web Title: Buldana collector's office seize action avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.