बुलडाणा : कडक निर्बंधांच्या अंमलबजावणीपुर्वी उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 10:55 AM2021-05-11T10:55:37+5:302021-05-11T10:55:46+5:30
Lockdown in Buldhana : निर्बंधांना सुरुवात हाेण्यापूर्वीची साेमवारी सकाळी बाजारपेठेत नागरिकांनी एकच गर्दी केली़.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस माेठ्या प्रमाणात वाढतच आहे़ वाढता काेराेना संसर्ग राेखण्यासाठी १० मे च्या रात्री आठ वाजल्यापासून ते २० मे पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहे़. या निर्बंधांना सुरुवात हाेण्यापूर्वीची साेमवारी सकाळी बाजारपेठेत नागरिकांनी एकच गर्दी केली़. शहरातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी रांगा लावल्या हाेत्या़ नागरिकांची हाेत असलेली गर्दी पाहून प्रशासनाने किराणा दुकान व भाजीपाला विक्रीस दुपारी चार वाजेपर्यंत मुभा दिली हाेती़.
जिल्ह्यात काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत आहे़. काेराेना रुग्णांची संख्या ७० हजारांवर गेली आहे़ तसेच मृत्यूची संख्या ४८१ वर पाेहोचली आहे़. शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत १५ एप्रिलपासून संचारबंदीसह इतर निर्बंध लादले आहेत़ सकाळी ७ ते ११ दरम्यान जीवनाश्यक वस्तूंची खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली हाेती़. या वेळेत बुलडाणा शहरासह ग्रामीण भागात माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत हाेती़ . त्यामुळे काेराेनाची साखळी तुटण्याऐवजी आणखी वाढत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले़. वाढता काेराेना संसर्ग राेखण्यासाठी १० मेच्या रात्री आठ वाजल्यापासून कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे़. जीवनाश्यक वस्तूंची केवळ हाेम डिलिव्हरी सुरू राहणार आहे़. नियमांचे पालन केल्यास नागरिकांची निर्बंधातून सुटका हाेणार आहे़ अन्यथा निर्बंधात वाढ हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही़.