बुलडाणा जिल्ह्यात १३८ पॉझिटिव्ह, १०२ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 12:10 PM2020-10-05T12:10:37+5:302020-10-05T12:10:50+5:30
CoronaVirus in Buldhana कोरोना बाधीतांचा आकडा ७,६४८ वर पोहोचला आहे.
बुलडाणा: जिल्ह्यातील रविवारी १३८ कोरोना बाधीत आढळून आले असून एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ७,६४८ वर पोहोचला आहे. मात्र सुदैवाची बाब म्हणजे गेल्या आठ दिवसापासून सातत्याने वाढणऱ्या मृत्यू संख्येला रविवारी ब्रेक मिळाला.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्ट मध्ये तपासण्यात आलेल्यांपैकी ४७६ जणांचे अहवाल रविवारी प्राप्त झाले. त्यापैकी ३३८ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर १३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये वाघजाई ११, पिंपळगाव सोनारा पाच, आडगाव राजा एका, मलकापूर पांग्रा एक, देऊळगाव राजा १२, गोंधन खेडा एक, सिंदखेड राजा एक, पांग्रा डोळे एक, वडगाव तेजन दोन, रायगाव चार, वझर आघाव सहा, हिरडव एक, सुलतानपूर एक, मांडवा एक, जांभूळ एक, लोणार दोन, नायगाव एक, मागझरी एक, ब्रम्हपुरी ेक, डोणगाव दोन, जानेफळ एक, बरटाळा एक, सोनाटी दोन, दे. माळी एक, विश्वी एक, दुधा एक, पिंपळगाव माळी एक, मेहकर नऊ, मलकापूर सात, धरणगाव एक, चिखली १८, करतवाड एक, हिवरा गडलींग एक, दिवठाणा एक, उंद्री एक, कोलारा दोन, पिंपरी माळी एक, बुलडाणा आठ, बोराखेडी दोन, धानोरा एक, जळगाव जामोद तीन, शेगाव एक, शिरला नेमाने तीन, घारोड एक, घाटपुरी एक, खामगाव सहा, नांदुरा पाच आणि वाशिम जिल्ह्यातील वाकद येथील एकाचा यामध्ये समावेश आहे.
दरम्यान, १०२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये बुलडाणा आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या कोवीड सेंटरमधून ३३, खामगाव ३७, देऊळगाव राजा १४ यासह अन्य ठिकाणच्या व्यक्तींचा समावेश आहे.