बुलडाणा जिल्ह्यात ३४९ पॉझिटिव्ह, २३४ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 11:13 AM2021-02-28T11:13:02+5:302021-02-28T11:13:48+5:30
coronavirus news २,९२७ अहवाल निगेटिव्ह तर ३४९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेल्या व रॅपिड टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३,२७६ अहवाल शनिवारी प्राप्त झाले. यापैकी २,९२७ अहवाल निगेटिव्ह तर ३४९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान २३४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये मलकापूर येथील ३२, नरवेल येथील ४, कुंड येथील पाच, दुधलगाव येथील एक, जांभुळधाबा येथील दोन, वरखेड येथील एक, उमाळी येथील एक, माकनेर येथील एक, पिंपळकुटा येथील एक, लोणवडी येथील एक, चिखली १२, अंत्रीकोळी एक, मेरा बुद्रुक एक, बोरगाव वसू एक, जांभोरा दोन, केळवद तीन, सवणा ९, शेलूद एक, हातणी दोन, सावखेड एक, अंचरवाडी दोन, चांधी दोन, सावंगी भगत एक, आमखेड एक, काळेगाव एक, अमडापूर दोन, भडगाव दोन, देऊळगाव राजा १२, अंढेरा दोन, टाकरखेड भागीले दोन, वडगाव एक, उंबरखेड दोन, सीनगाव जहागीर तीन, शिवणी आरमाळ एक, बुलडाणा ४९, हतेडी दोन, धामणगाव एक, गोंधनखेड दोन, दत्तपूर एक, दहीद बुद्रुक एक, मढ एक, सागवन एक, डोंगरखंडाळा दोन, कोलवड एक, सुंदरखेड चार, शेलसूर एक, मोताळा दहा, पिंप्री गवळी दोन, धामणगाव बढे दोन, सारोळा मारोती एक, जळगाव जामोद पाच, भेंडवळ एक, खामगाव २०, घाटपुरी एक, भालेगाव पाच, पिंपळगाव देशमुख दोन, कुंबेपळ दोन, बोरजवळा एक, दधम एक, निरोड एक, कंचनपूर एक, कंझारा एक, शेगाव ४६, माटरगाव एक, खेर्डा एक, चिंचखेड चार, चिंचोली दोन, खौलखेड सात, जलंब एक, लोणार पाच, सिंदखेड राजा १४, पिंपळखुटा तीन, शेंदुर्जन पाच, रुम्हणा एक, किनगाव राजा एक, हिरडव दोन, कुरमपूर तीन, गुंधा तीन, जानेफळ एक, गजरखेड एक, संग्रामपूर नऊ, शेंबा एक आणि अकोला येथील एकाचा समावेश आहे. दुसरीकडे २३४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजपर्यंत १ लाख ३३ हजार ५७२ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोना बाधितांपैकी १५ हजार ४९२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली.