बुलडाणा जिल्ह्यात ६६ ‘पॉझिटिव्ह’, ६३ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 01:00 PM2020-10-31T13:00:00+5:302020-10-31T13:18:04+5:30

Buldhana CoronaVirus News ६३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांची रुग्णालयातून सुटी झाली आहे.

In Buldana district, 66 'positives', 63 people beat Corona | बुलडाणा जिल्ह्यात ६६ ‘पॉझिटिव्ह’, ६३ जणांची कोरोनावर मात

बुलडाणा जिल्ह्यात ६६ ‘पॉझिटिव्ह’, ६३ जणांची कोरोनावर मात

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क 
बुलडाणा: जिल्ह्यात शुक्रवारी तपासण्यात आलेल्या १,१५९ संदिग्धांच्या अहवालापैकी ६६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, ६३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांची रुग्णालयातून सुटी झाली आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्टमध्ये तपासण्यात आलेल्या १,१५९ संदिग्धांच्या अहवालापैकी १०३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये  जळगाव जामोद तीन, टाकळी पी. १, पिंपळगाव राजा दोन, घारोड एक, शहापूर एक, गणेशपूर तीन, बुलडाणा १२, चांडोळ चार, वरवंड एक, मौंढाळा एक, पळसखेड तीन, देऊळगाव वायसा एक, लोणार दोन, मेहकर दोन, डोणगाव एक, रायपूर दोन, सवडत एक, खैरव तीन, शेळगाव आटोळ एक, चिखली एक, देऊळगाव राजा दोन, सावखेड भोई एक, गिरोली एक, उंबरखेड एक, सिंदखेड राजा चार, महारखेड एक, पळसखेड चक्का चार, पिंपळखुटा एक, किनगाव राजा एक, शेगाव एक, नांदुरा दोन या प्रमाणे ६६ जण पॉझिटिव्ह आढळून आले.
   दरम्यान ६३ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये कोविड केअर सेंटरनुसार मोताळा एक, मेहकर २३, मलकापूर चार, खामगाव नऊ, चिखली १८, बुलडाणा पाच, जळगाव जामोद एक, लोणार एक आणि संग्रामपूर एक या प्रमाणे कोरोना मुक्त झालेल्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
 दरम्यान तपासणी करण्यात आलेल्या ४२ हजार ५४५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. तर बाधितांपैकी आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ८,६१० आहे. वर्तमान स्थितीत २,६१२ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा असून एकूण कोरोना बाधितांची संख्या ९,३६९ झाली आहे. सध्या  जिल्ह्यात ६३४ कोरोना बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत, तर आतापर्यंत जिल्ह्यात १२५ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची टक्केवारी ६.७६ टक्के आहे. रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाणही वाढले आहे. 

Web Title: In Buldana district, 66 'positives', 63 people beat Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.