बुलडाणा निवडणूक 2019: बुलडाणा जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९१ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:29 PM2019-10-21T12:29:38+5:302019-10-21T12:48:13+5:30

बुलडाणा जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९१ टक्के मतदान

In Buldana district, as of 9 am, 15.91 percent voting | बुलडाणा निवडणूक 2019: बुलडाणा जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९१ टक्के मतदान

बुलडाणा निवडणूक 2019: बुलडाणा जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९१ टक्के मतदान

Next

बुलडाणा: विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १५.९१ टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यात एकूण तीन लाख २४ हजार ८७० मतदारांनी मतदान केले असल्याची माहिती निवडणूक विभागातील सुत्रांनी दिली. सध्या जिल्ह्यात शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रावरील मतदान यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले होते. ते तातडीने बदलण्यात आले आहेत. मात्र दोन मतदान केंद्रावर जवळपास तासाभराच्या उशिराने मतदान सुरू झाल्याची ओरड होत आहे. हे किरकोळ अपवाद वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान सुरू आहे. मलकापूर विधानसभा मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यंत ३९ हजार ६६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बुलडाण्यामध्ये ४६ हजार ६२८, चिखलीमध्ये ४५ हजार २६, सिंदखेड राजामध्ये ५१ हजार ११२, मेहकरमध्ये ४७ हजार एक, खामगावमध्ये ५० हजार ३५३ आणि जळघाव जामोदमध्ये ४५ हजार ४६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत सातही विधानसभा मतदारसंघ मिळून १९.७२ टक्के पुरुषांनी अर्थात दोन लाख १० हजार ९३५ पुरुषांनी तर एक लाख १३ हजार ९३५ (११.७२) महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत सर्वाधिक १७.९८ टक्के मतदान झाले होते तर त्या खालोखाल खामगाव विधानसभा मतदारसंघात १६.०५ टक्के मतदान झाले आहे. सकाळी सात वाजेच्या सुमारास मतदानास प्रारंभ झाला. सुरूवातील मतदान केंद्रावर फारशी गर्दी नव्हती. सकाळी नऊ वाजेपर्यंत ९८ हजार ४३८ मतदारांनी जिल्ह्यात मतदान केले होते. त्यानंतर हळूहळू मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांची गर्दी होऊ लागल आहे. ग्रामीण भागात नागरिक मतदानासाठी घराबाहेर पडले होते तर शहरी भागात तुलनेने मतदानाचा टक्का तुर्तास तरी कमी आहे.

Web Title: In Buldana district, as of 9 am, 15.91 percent voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.