बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ९१.३३ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 02:53 PM2019-11-02T14:53:28+5:302019-11-02T14:53:34+5:30

पाणलोट क्षेत्रामध्ये सरासरी तब्बल ८७३ मिमी पाऊस पडल्याने बहुतांश सर्व प्रकल्प तुडूंब भरले आहे.

In Buldana district, 91.33% water storage in projects | बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ९१.३३ टक्के जलसाठा

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ९१.३३ टक्के जलसाठा

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गतवर्षी अवर्षणाचा फटका सहन करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्येही अवघा १७ टक्के पाणीसाठा असताना यंदा मात्र जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये तब्बल ९१.३३ टक्के पाणीसाठा असल्याचे सुखद चित्र आहे. गतवर्षीच्या तुलनेत दुपटीने प्रकल्पांतील पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्याने हे प्रकल्प भरण्यास मदत झाली असल्याचे बुलडाणा पाटबंधारे विभागाकडून प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
दरम्यान, पाणी आरक्षण समितीची बैठक अद्याप झालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष पिण्यासाठी किती पाणी आरक्षीत राहील व सिंचनासाठी किती पाणी उपलब्ध करण्यात येईल याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. मात्र यंदा प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत ४३ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. यंदा जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सरासरी तब्बल ८७३ मिमी पाऊस पडल्याने बहुतांश सर्व प्रकल्प तुडूंब भरले आहे. २०१४ नंतर प्रथमच ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांमध्ये हा पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीचा विचार करता प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अवघा ४५०.४ मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे प्रकल्प तहानलेलेच होते. यंदा मात्र तशी स्थिती नाही. जिल्ह्यातील प्रकल्पांचा विचार करता एकट्या पलढग प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल ११०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. अन्य प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात त्या तुलनेत कमी पाऊस पडलेला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In Buldana district, 91.33% water storage in projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.