बुलडाणा : जिल्हाधिकारी पोहोचले गारपीटग्रस्तांच्या बांधावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 01:28 AM2018-02-15T01:28:15+5:302018-02-15T01:30:52+5:30
डोणगाव : परिसरातील मादणी, आरेगाव या परिसरात झालेल्या गारपिटीने शेकडो हेक्टरवरील हरभरा व गहू, लसण, कांदा, तूर, संत्रा या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला असून, गारपीटग्रस्त भागातील शेतकर्यांच्या नुकसानाचा सर्व्हे त्वरित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांनी कर्मचार्यांना दिला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव : परिसरातील मादणी, आरेगाव या परिसरात झालेल्या गारपिटीने शेकडो हेक्टरवरील हरभरा व गहू, लसण, कांदा, तूर, संत्रा या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला असून, गारपीटग्रस्त भागातील शेतकर्यांच्या नुकसानाचा सर्व्हे त्वरित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांनी कर्मचार्यांना दिला होता.
डोणगाव परिसरातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी १३ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी पुलकुंडवार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर, जि.प.सदस्य आशिष रहाटे, जि.प.सदस्य राजेंद्र पळसकर, उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, नायब तहसीलदार वैशाली जायगुडे, मीरा पागोरे, मंडळ अधिकारी रहोटे, तलाठी वंदना नाईक, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अँड.शैलेश देशमुख, मादणीचे उपसरपंच अमोल जाधव यांनी मादणी येथे येऊन प्रत्यक्ष शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सदर आदेश दिले. यावेळी मादणी परिसरात नुकसान झालेल्या हरभरा, तूर, गहू, संत्रा, कांदा, लसून या पिकांची पाहणी करून, तालुका कृषी अधिकारी सरोदे यांच्याकडून गारपीटग्रस्त गावाची माहिती घेऊन बाधित २७ गावांचा त्वरित सर्व्हे करून शासनाला देण्याचे निर्देश दिले. तर कृषी अधिकारी सरोदे यांनी युद्धपातळीवर शेतकरी नुकसानीचा सर्व्हे चालु असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकर्यांचे सांत्वन करून त्वरित शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले, तर जिल्हाधिकार्यांपुढे शेतकरी वर्ग व व्यापारी यांनी समस्या मांडल्या. यावेळी मादणी येथील कैलास जाधव, भाजपाचे प्रा.केशव वाहेकर, माजी उपसभापती सतीश ताजणे, माजी पं.स.सभापती पंजाबराव मेटांगळे, डॉ.उल्हामाले, माजी सरपंच मधुकरराव धिरके, प्रा.डॉ.सचिन जाधव, गणेश दिवठाणे, दीपक दिवठाणेसह शेतकरी उपस्थित होते.
शेतकर्यांना मदतीची हेक्टरी र्मयादा वाढवा-जाधव
शासनाने आपत्तीग्रस्त शेतकर्यांना दोन हेक्टरपर्यंत ठेवलेली र्मयादा वाढवावी, कारण विदर्भातील शेतकर्यांचे अतोनात नुकसान या अवकाळी गारपिटीमुळे झालेले आहे, तसेच विदर्भातील शेतकर्यांकडे जमिनीचे क्षेत्र अधिक असल्याने शासनाने दोन हेक्टरी मदतीची र्मयादा वाढवून जेवढे नुकसान शेतकर्यांचे झाले तेवढी मदत शासनाने द्यावी, अशी मागणी यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी केली.
गतवर्षीचे पैसे केव्हा मिळणार!
मादणीचे उपसरपंच अमोल जाधव यांनी जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांना सन २0१५-१६ मधील फळबाग आपत्तीची मदत अद्यापपर्यंत शेतकर्यांना सर्व्हे होऊन मिळालेली नाही. तर मग आता हा गारपिटीचा सर्व्हे करुन आम्हाला मदत केव्हा मिळणार, असा प्रश्न करताच जिल्हाधिकारी यांना सदर प्रकरणाची चौकशी करुन मला त्वरित अहवाल द्या, असा सर्वांसमक्ष आदेश कृषी अधिकारी सरोदे व तलाठी नाईक यांना दिला