बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाचे ‘ई-ग्रंथालय’ यू-ट्युबवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:28 AM2018-02-09T00:28:21+5:302018-02-09T00:30:23+5:30
बुलडाणा : जिल्हाधिकारी कार्यालयाचे ई-ग्रंथालय यू-ट्युबवर सबस्क्राइब करण्यात आले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना यासंदर्भातील महत्त्वपूर्ण व अद्ययावत माहिती एका क्लिकवर मिळू शकणार आहे.
सोहम घाडगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्हाधिकारी कार्यालयाचे ई-ग्रंथालय यू-ट्युबवर सबस्क्राइब करण्यात आले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना यासंदर्भातील महत्त्वपूर्ण व अद्ययावत माहिती एका क्लिकवर मिळू शकणार आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळाव्या, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात तीन वर्षांपूर्वी ई-ग्रंथालय सुरू करण्यात आले. या ग्रंथालयात अद्ययावत अभ्यासिका, इंटरनेट, पुस्तके उपलब्ध आहेत. दरवर्षी ५0 विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला जातो. यासाठी चाचणी परीक्षा घेतली जाते. यंदा जिल्ह्यातील ३५0 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्याद्वारे ५८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसंदर्भात जास्तीत जास्त माहिती लगेच उपलब्ध व्हावी, यासाठी ई-ग्रंथालयाचे यू-ट्युबवर सबस्क्राइब करण्यात आले आहे. ग्रंथालयाद्वारे राबविल्या जाणार्या उपक्रमांची माहिती भविष्यात या चॅनेलवर अपलोड करण्यात येणार आहे. तसेच स्पर्धा परीक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या लिंक, अभ्यासक्रम टाकण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वर्हाडे यांनी दिली.
ई-गं्रथालयाच्या लोगोचे अनावरण जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सदर उपक्रम राबविण्यात आला असून, यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना चांगला फायदा होणार आहे.
दर महिन्याला तज्ज्ञांचे मार्गदर्शन
ई-ग्रंथालयातर्फे दर महिन्याला विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. याकरिता सर्वांंसाठी प्रवेश खुला असणार आहे. दरम्यान, गुरुवारी भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक सुजीत जाधोर यांचे व्याख्यान झाले. यावर्षीचे हे पहिलेच व्याख्यान होते.
ई-ग्रंथालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत चांगल्या सुविधा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यू-ट्युबवर सबस्क्राइब केल्यामुळे भविष्यात माहितीचा ओघ अधिक वेगवान होईल.
- ललितकुमार वर्हाडे, निवासी उपजिल्हाधिकारी, बुलडाणा