बुलडाणा जिल्ह्याला मानसिक आजारांचा विळखा!
By admin | Published: February 2, 2016 02:05 AM2016-02-02T02:05:45+5:302016-02-02T02:05:45+5:30
वर्षभरात दोन हजार मनोरुग्ण आढळले.
बुलडाणा : आजच्या धावपळीच्या युगात माणसाला भेडसावणार्या आर्थिक समस्या, दिवसेंदिवस वाढत जाणारा कामाचा ताण, कौटुंबीक कलह यासह विविध कारणाने निर्माण होणारे ताणतणाव आणि सततची चिंता व भीतीने माणूस ग्रासला आहे. परिणामी विविध मानसिक आजारांचे रूग्ण वाढत आहेत. जिल्ह्यात मागील वर्षभरात जवळपास २ हजार ५४0 मानसिक रूग्ण जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारादाखल आल्याची माहिती आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाचे जिवनमान उंचावले आहे. त्यामुळे प्रत्येकजण भौतीक सुखाच्यामागे धावत आहे. या धावपळीत माणूस सुखी होण्याऐवजी दिवसेंदिवस दु:खाच्या खाईत लोटल्या जात आहे. आर्थीक समस्या, कामाचा ताण, त्यातच कौटुंबीक कलह, खानपानामुळे बदललेली जिवनशैली यामुळे माणूस आत्मकेंद्रीत होऊन विविध मानसिक आजाराच्या विळख्यात सापडत आहे. अलीक या मानसिक आजाराच्या रुग्णामध्ये वाढ होत असून हा आजार चिंतेचा विषय झाला आहे. मानसिक आजारांचे लोकांमध्ये वाढते प्रमाण लक्षात घेऊन सप्टेंबर २0१४ पासून आरोग्य विभागातर्फे जिल्हा सामान्य रूग्णालयात मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.