बुलडाणा जिल्ह्यात आठ कोरोनाबाधित, ५० जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 10:45 AM2021-07-10T10:45:24+5:302021-07-10T10:45:29+5:30

corona Cases in Buldhana : एकूण ३ हजार १५८ संदिग्धांच्या अहवालापैकी ३ हजार १५० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

In Buldana district, eight coronas were affected and 50 people were defeated | बुलडाणा जिल्ह्यात आठ कोरोनाबाधित, ५० जणांची कोरोनावर मात

बुलडाणा जिल्ह्यात आठ कोरोनाबाधित, ५० जणांची कोरोनावर मात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या संदिग्धांच्या तपासणीमध्ये केवळ आठजण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण ३ हजार १५८ संदिग्धांच्या अहवालापैकी ३ हजार १५० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये  बुलडाणा तालुक्यातील तीन, चिखली तालुक्यातील चार आणि सिंदखेड राजा तालुक्यातील एकाचा समावेश आहे. दरम्यान, दहा तालुक्यांतील तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी एकही जण कोरोनाबाधित आढळून आला नाही. दुसरीकडे शुक्रवारी ५० जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान, आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ५ लाख ९७ हजार २४० संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांपैकी ८६ हजार ३१९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेटही आता बराच खाली आला आहे.
 

Web Title: In Buldana district, eight coronas were affected and 50 people were defeated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.