विभागात बुलडाणा जिल्हा प्रथम
By admin | Published: June 13, 2017 07:59 PM2017-06-13T19:59:41+5:302017-06-13T19:59:41+5:30
जिल्ह्यात सिंदखेड राजा तालुका प्रथम : निकालात मुलींची बाजी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्याने यावर्षीसुद्धा दहावीच्या परिक्षेत अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकावून आपला लौकीक कायम ठेवला आहे. जिल्ह्याचा निकाल ८८.४९ टक्के एवढा लागला असून जिल्ह्यात सिंदखेड राजा तालुक्याने ९५.६४ टक्के निकाल घेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.
जिल्ह्यातील ४९९ शाळांमधून ४० हजार ७९६ विद्यार्थी नोंदविल्या गेले होते. प्रत्यक्षात ४० हजार ६५२ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. यामध्ये ३५ हजार ९७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हा निकाल ८८.४९ टक्के एवढा लागला आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८६.४१ एवढे असून मुलींची टक्केवारी ९१.१६ टक्के एवढी आहे. तर मातृतिर्थ सिंदखेडराजा तालुक्यांमध्ये मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९७.०१ टक्के एवढे असून जिल्ह्यात हा तालुका ९५.६४ टक्के निकाल देत अव्वल ठरला आहे. तर त्या खालोखाल दे. राजा ९३.७८ टक्के व चिखली ९२.८५ टक्के निकाल देत दुसरा व तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. तर सर्वाधिक कमी निकाल शेगावचा तालुक्याने ८०.२५ टक्के निकाल दिला आहे. बुलडाणा तालुक्यातून ४ हजार ५२१ मुले पास झाली. मोताळा तालुक्यातून १ हजार ९०६ विद्यार्थी पास झाले आहे. चिखली तालुक्यात ४ हजार ३८९ विद्यार्थी पास झाले. देऊळगाव राजा तालुक्यात २ हजार १७१ विद्यार्थी पास झाले. सिंदखेडराजा तालुक्यात २ हजार ३६७ विद्यार्थी पास झाले. लोणार तालुक्यात २ हजार ३७८ विद्यार्थी परिक्षेला बसले होते, त्यापैकी २ हजार १५३ विद्यार्थी पास झाले आहे. मेहकर तालुक्यात ४ हजार २४७ विद्यार्थी परिक्षेला बसले होते, त्यापैकी ३ हजार ७४८ विद्यार्थी पास झाले. खामगाव तालुक्यातून ५ हजार ४ विद्यार्थी परिक्षेला बसले होते, त्यापैकी ४ हजार २३८ विद्यार्थी पास झाले. शेगाव तालुक्यात २ हजार १४१ विद्यार्थी पास झाले. नांदूरा तालुक्यात २ हजार ३६० विद्यार्थी पास झाले. मलकापूर २ हजार ४५७ विद्यार्थी पास झाले. जळगांव जामोद तालुक्यात २०१० विद्यार्थी पास झाले. संग्रामपूर तालुक्यात १ हजार ८१६ विद्यार्थी परिक्षेला बसले होते, त्यापैकी १ हजार ५६४ विद्यार्थी पास झाले.