विभागात बुलडाणा जिल्हा प्रथम

By admin | Published: June 14, 2017 01:37 AM2017-06-14T01:37:34+5:302017-06-14T01:37:34+5:30

सिंदखेडराजा तालुका जिल्ह्यात अव्वल : निकालात मुलींची बाजी

Buldana district first in the division | विभागात बुलडाणा जिल्हा प्रथम

विभागात बुलडाणा जिल्हा प्रथम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्याने यावर्षीसुद्धा दहावीच्या परीक्षेत अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकावून आपला लौकिक कायम ठेवला आहे. जिल्ह्याचा निकाल ८८.४९ टक्के एवढा लागला असून, सिंदखेडराजा तालुक्याने ९५.६४ टक्के निकाल घेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
जिल्ह्यातील ४९९ शाळांमधून ४० हजार ७९६ विद्यार्थी नोंदविल्या गेले होते. प्रत्यक्षात ४० हजार ६५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये ३५ हजार ९७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हा निकाल ८८.४९ टक्के एवढा लागला आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८६.४१ एवढे असून, मुलींची टक्केवारी ९१.१६ टक्के एवढी आहे. तर मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यांमध्ये मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९७.०१ टक्के एवढे असून, जिल्ह्यात हा तालुका ९५.६४ टक्के निकाल देत अव्वल ठरला आहे. तर त्या खालोखाल दे. राजा ९३.७८ टक्के व चिखली ९२.८५ टक्के निकाल देत दुसरा व तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. तर सर्वाधिक कमी निकाल शेगावचा तालुक्याने ८०.२५ टक्के निकाल दिला आहे. बुलडाणा तालुक्यातून ४ हजार ५२१ मुले पास झाली. मोताळा तालुक्यातून १ हजार ९०६ विद्यार्थी पास झाले आहे. चिखली तालुक्यात ४ हजार ३८९ विद्यार्थी पास झाले. देऊळगावराजा तालुक्यात २ हजार १७१ विद्यार्थी पास झाले. सिंदखेडराजा तालुक्यात २ हजार ३६७ विद्यार्थी पास झाले. लोणार तालुक्यात २ हजार ३७८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी २ हजार १५३ विद्यार्थी पास झाले आहे. मेहकर तालुक्यात ४ हजार २४७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ३ हजार ७४८ विद्यार्थी पास झाले. खामगाव तालुक्यातून ५ हजार ४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ४ हजार २३८ विद्यार्थी पास झाले. शेगाव तालुक्यात २ हजार १४१ विद्यार्थी पास झाले. नांदुरा तालुक्यात २ हजार ३६० विद्यार्थी पास झाले. मलकापूर २ हजार ४५७ विद्यार्थी पास झाले. जळगाव जामोद तालुक्यात २०१० विद्यार्थी पास झाले. संग्रामपूर तालुक्यात १ हजार ८१६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १ हजार ५६४ विद्यार्थी पास झाले.

तालुकानिहाय निकाल
- बुलडाणा ९१.३१
- मोताळा८७.८३
- चिखली ९२.८५
- देऊळगावराजा ९३.७८
- सिंदखेडराजा ९५.६४
- लोणार९१.२७
- मेहकर८८.७९
- खामगाव ८४.८६
- शेगाव८०.२५
- नांदुरा८१.८४
- मलकापूर ९०.९७
- जळगाव जामोद ८२.१४
- संग्रामपूर ८६.६५

रिपिटरमध्येही प्रथम
अमरावती विभागात रिपिटरमध्येही बुलडाणा जिल्हा प्रथम आला आहे. यावर्षी रिपिटर म्हणून बुलडाणा जिल्ह्यातून २ हजार २३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २ हजार १७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८६९ विद्यार्थी पास झाले असून, त्याची टक्केवारी ४३.०८ आहे. त्यात प्रावीण्य श्रेणीत ६ विद्यार्थी पास झाले असून, प्रथम श्रेणीत ५० व द्वितीय श्रेणीत १२४ विद्यार्थी पास झाले आहेत. गुणाची टक्केवारी वाढण्यासाठी अनेक विद्यार्थी रिपिटर म्हणून परीक्षा देत असतात.

Web Title: Buldana district first in the division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.