बुलडाणा जिल्ह्याला मिळाले पाच नवे तहसिलदार, तीन एसडीओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 11:16 AM2020-10-03T11:16:41+5:302020-10-03T11:16:48+5:30
Buldhana News बुलडाणा जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसह, पाच तहसिलदार आणि तीन एसडीओ बदलणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गेल्या काही महिन्यापासून अपेक्षीत असलेल्या महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी आणि तहसलिदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या महसूल व वन विभागाने एक आॅक्टोबर रोजी बदल्या केल्या आहेत. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसह, पाच तहसिलदार आणि तीन एसडीओ बदलणार आहेत.
प्रामुख्याने बुलडाणा, खामगाव, सिंदखेड राजा, मलकापूर आणि नांदुरा येथील तहसिलदार बदलेले आहेत. यामध्ये बुलडाण्याचे तहसिलदार म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील रुपेश खंडारे, अमरावती येथून अतुल पाटोळे हे खामगाव, अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील सुनील सावंत यांची सिंदखेड राजा, तेल्हारा येथील आर. यु. सुरडकर यांची मलकापूर, यवतमाळ येथील कुणाल झाल्टे यांची नांदुरा येथे तहसिलदार म्हणून बदली झाली आहे.
दरम्यान यवतमाळ येथील उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी यांची सिंदखेड राजा येथे एसडीओ, यवतमाळ एसडीओ मनोज देशमुख यांची मलकापूर एसडीओ आणि वाशिम येथील भुसंपादन अधिकारी राजेश जाधव यांची खामगाव एसडीओ म्हणून बदली झाली आहे. अल्पावधीतच ते नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होणार आहेत. दुसरीकडे बुलडाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांची बाळापूर एसडीओ म्हणून बदली झाली आहे.
दुसरीकडे सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी विवेक काळे यांची हे यवतमाळ येथे सुभाष दळवी यांच्या जागेवर रुजू होती. बुलडाण्याचे सध्याचे तहसिलदार एस. जे. शिंदे हे अकोला येथे सहाय्यक पुरवठा अधिकारी म्हणून जात आहे. मोताळ््याचे तहिसलादर व्ही. एस. कुमरे यांची यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथे तर संग्रामपुरचे तहसिलदार डी. एल. मुकुंदे यांची बाळापूर तहसिदाल म्हणून बदली झाली आहे. दरम्यान, बदली झालेल्या अधिकाºयांना त्वरित पदस्थापना दिलेल्या नव्या ठिकाणी जावे लागणार आहे.
तसेच शासनाच्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही अधिकाºयाची रजा मंजूर करण्यात येणार नसल्याचे यासंदर्भातील आदेशात महसूल व वने विभागाचे उपसचीव डॉ. माधव वीर यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसापासून या बदल्या रखडल्या होत्या.