बुलडाणा जिल्ह्यात २६२ नवीन मतदान केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:28 PM2018-08-29T12:28:36+5:302018-08-29T12:30:55+5:30
बुलडाणा : भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार १ जानेवारी २०१९ अर्हता दिनांकावर आधारित पुर्ननिरिक्षण कार्यक्रमातंर्गत मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण कार्यक्रम राबविण्यात आला.
बुलडाणा : भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार १ जानेवारी २०१९ अर्हता दिनांकावर आधारित पुर्ननिरिक्षण कार्यक्रमातंर्गत मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण कार्यक्रम राबविण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात २६२ नवीन मतदान केंद्राची भर पडली आहे. सदर कार्यक्रम २१ जून ते ३१ जुलै २०१८ कालावधीमध्ये जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघात राबविण्यात आला. त्यानुसार मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरणाचे काम पुर्ण झाले असून भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी त्यास मान्यताही दिली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात २६२ नवीन मतदान केंद्रांची भर पडली असून एकूण मतदान केंद्रांची संख्या २२५१ वर पोहोचली आहे. पूर्वी ही संख्या १९८९ होती. विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान केंद्रांची स्थिती व झालेली वाढ : मलकापूर- यापुर्वीची मतदान केंद्र २७३, नव्याने वाढ झालेली मतदान केंद्र २७ व एकूण मतदान केंद्र ३००, बुलडाणा - यापूर्वीची मतदान केंद्र २७५, नव्याने वाढ झालेली मतदान केंद्र ५५ व एकूण मतदान केंद्र ३३०, चिखली - यापूर्वीची मतदान केंद्र २७२, नव्याने वाढ झालेले मतदान केंद्र ४० व एकूण मतदान केंद्र ३१२, सिंदखेड राजा - यापूर्वीची मतदान केंद्र ३१४, नव्याने वाढ झालेली मतदान केंद्र १८ व एकूण मतदान केंद्र ३३२, मेहकर- यापुर्वीची मतदान केंद्र २९६, नव्याने वाढ झालेली मतदान केंद्र ५२ व एकूण मतदान केंद्र ३४८, खामगांव - यापुर्वीची मतदान केंद्र २९१, नव्याने वाढ झालेली मतदान केंद्र २५ व एकूण मतदान केंद्र ३१६, जळगांव जामोद - यापूर्वीची मतदान केंद्र २६८, नव्याने वाढ झालेली मतदान केंद्र ४५ व एकूण मतदान केंद्र ३१३ अशाप्रकारे नवीन २६२ मतदान केंद्र वाढली आहेत. एकूण मतदान केंद्रांची जिल्ह्यातील संख्या २२५१ वर पोहोचली आहे. कोणत्या मतदान केंद्रांमधील वाढीची माहिती संबंधित मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयामध्ये तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक विभागामध्ये उपलब्ध करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहेत.