बुलडाणा जिल्ह्यात 'मिसिंग'चे प्रमाण वाढले: हरविलेल्यांना शोधणे पोलीसांसमोर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 06:10 PM2019-01-18T18:10:54+5:302019-01-18T18:11:13+5:30
बुलडाणा: तालुक्यातील केसापूर येथील महिला आपल्या दोन लहान मुलांसह दहा दिवसांपासून बेपत्ता असल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात १७ जानेवारीला रायपूर येथील पोलीस स्टेशनला तीनजण हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
बुलडाणा: तालुक्यातील केसापूर येथील महिला आपल्या दोन लहान मुलांसह दहा दिवसांपासून बेपत्ता असल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात १७ जानेवारीला रायपूर येथील पोलीस स्टेशनला तीनजण हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात व्यक्ती बेपत्ता होण्याचे प्रकार वाढल्याने पोलिसांसमोर हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेणे आव्हान ठरत आहे.
बुलडाणा तालुक्यातील केसापूर येथील आशा गजानन काळे (वय २७) ही तिच्या राणी गजानन काळे (वय ७) व सनी गजानन काळे (वय ५) या दोन मुलांना घेऊन कोणालाही काही न सांगता घरुन निघुन गेली. यासंदर्भात गजानन भगवान काळे (वय ३१) यांनी रायपूर येथील पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यावरुन रायपूर पोलीस स्टेशनला पोलिसांनी हरविल्याची नोंद केली आहे. याप्रकरणाचा तपास पुढील तपास एएसआय विजय हुडेकर हे करीत आहेत. जिल्ह्यात काही दिवसांपासून महिला, पुरूष, वृद्ध, युवक, युवती हरविल्याच्या घटना अधिक वाढल्या आहेत. त्यामुळे हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनाला कसुन चौकशी करावी लागत आहे. बुलडाण्याबरोबरच मेहकर तालुक्यातही असे प्रकार गेल्या काही दिवसापासून समोर येत आहेत.
युवती घरून निघून गेली
मेहकर: येथील मामाच्या घरी शिक्षणासाठी आलेली युवती घरी कुणाला न सांगता घरुन निघून गेल्याची तक्रार युवतीच्या मामाने मेहकर पोलीस स्टेशनला दिली आहे. बेलगाव येथील फिजा परवीन शेख कयुम (१८) ही युवती मेहकर येथील मामा शेख निसार शेख गफ्फार यांचेकडे शालेय शिक्षणासाठी राहत होती. सोमवारी दुपारी घरी कुणालाही न सांगता घरुन निघून गेली आहे. याची तक्रार युवतीचे मामा शेख निसार शेख गफ्फार यांनी मेहकर पोलीस स्टेशनला दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक मनिषा हिवराळे, सतीष मुळे हे करीत आहेत. (प्रतिनिधी)