बुलडाणा जिल्हा : संभाजी राजे शिक्षण संस्था संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 14:35 IST2018-01-10T14:31:49+5:302018-01-10T14:35:02+5:30
डोंगरखंडाळा : येथील संभाजी राजे शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षपदी राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांची सलग तिसऱ्यांदा तर सचिवपदी दलितमित्र शेषराव बारीकराव सावळे व कोषाध्यक्षपदी प्रल्हादराव गणपतराव सावळे पाटील यांची अनुक्रमे दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे.

बुलडाणा जिल्हा : संभाजी राजे शिक्षण संस्था संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध
डोंगरखंडाळा : येथील संभाजी राजे शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षपदी राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांची सलग तिसऱ्यांदा तर सचिवपदी दलितमित्र शेषराव बारीकराव सावळे व कोषाध्यक्षपदी प्रल्हादराव गणपतराव सावळे पाटील यांची अनुक्रमे दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे.
डोंगरखंडाळा येथील राजे शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाची २०१७ ते २०२७ या कालावधीसाठी निवडणूक प्रक्रिया नुकतीच बिनविरोध संपन्न झाली. संभाजी राजे शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी राधेश्याम चांडक, सचिव दलित मित्र शेषराव सावळे, कोषाध्यक्ष श्री.प्रल्हाद पाटील तर संचालकपदी अॅड.विजय हिंमतराव सावळे, कोमलताई सुकेश झवंर, श्रीमती इंदिराताई शेषराव सावळे, श्रीकृष्ण शेषराव सावळे, श्याम प्रल्हादराव सावळे, नितीन हिंमतराव सावळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड.अभय चव्हाण यांनी काम पाहिले. दरम्यान बिनविरोध सर्व नवनिर्वाचीत पदाधिकाºयांनी संभाजी राजे शिक्षण संस्थेच्या कार्यालयात सोमवारी ८ आपल्या पदाचा पदभार स्विकारला. नवनिर्वाचीत पदाधिकारी व संचालक मंडळाचे संस्थेच्या आश्रयदाते आजिव सभासद व डोंगरखंडाळा ग्रामस्थांनी