बुलडाणा जिल्हा शल्यचिकित्सक पंडीत सक्तीच्या रजेवर; प्रभार घोलप यांच्याकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 11:47 AM2020-09-19T11:47:00+5:302020-09-19T12:06:07+5:30
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असल्याची चर्चा होती
बुलडाणा: जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यांचा पदार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक असलेले कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. सुरेस घोलप यांच्याकडे देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसापासून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असल्याची चर्चा होती. याचे अकोला येथील आरोग्य उपसंचालक डॉ. रियाज फारूखींनी दोन दिवापूर्वी खंडन केले होते. परंतु, आरोग्य विभागाने जारी केलेल्या ११ सप्टेंबर रोजीच्या आदेशात डॉ. पंडित यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, असा स्पष्ट उल्लेख आहे. दरम्यान, वर्तमान स्थितीत डॉ. पंडीत यांना रजेवर पाठविण्यात आल्यामुळे त्यांचा पदभार जिल्हा सामान्य रुग्णालयातीलच डॉ. सुरेश घोलप यांच्याकडे देण्यात आला आहे तर डॉ. घोलप यांचा अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकपदाचा पदभार हा डॉ. भागवत भुसारी यांच्याकडे देण्यात आला आहे. डॉ. भुसारी हे जनरल सर्जन असून सातगाव भुसारी हे त्यांचे मुळ गाव आहे.