पेंचाक सिलाटमध्ये बुलडाणा जिल्ह्याचा संघ झळकणार राष्ट्रीय स्तरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:38 AM2021-09-06T04:38:35+5:302021-09-06T04:38:35+5:30
कर्जत तालुक्यातील रॉयल गार्डन येथे महाराष्ट्र पेंचाक सिलाट असोसिएशनकडून दहाव्या राज्यस्तरीय पेंचाक सिलाट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ...
कर्जत तालुक्यातील रॉयल गार्डन येथे महाराष्ट्र पेंचाक सिलाट असोसिएशनकडून दहाव्या राज्यस्तरीय पेंचाक सिलाट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा १ ते ३ सप्टेंबर असे सलग तीन दिवस रॉयल गार्डन येथे झाली. यामध्ये महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांतील ३५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन पेंचाक सिलाट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले, खजिनदार मुकेश सोनवाणे, संकेत धामंदे, साहेबराव ओहोळ, पौर्णिमा तेली, विकास बडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ भाजपचे किसान मोर्चाचे कोकण संपर्कप्रमुख सुनील गोगटे, महाराष्ट्र पेंचाक सिलाट असोसिएशन अध्यक्ष सुरेंद्र प्रताप सिंग, किशोर येवले, विशाल सिंग, संदीप पाटील, संकेत धामंदे, आदींच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेमध्ये १५ सुवर्ण, सात रजत व तीन कांस्यपदक मिळवत कोल्हापूर संघाने चषक पटकावला. बुलडाणा जिल्हा संकेत धामंदे यांच्या संघाने आठ सुवर्ण, सहा रजत, सात कांस्यपदक प्राप्त करत राष्ट्रीय खेळाडू जयश्री शेट्टे, संकेत सरोदे, आरती खंडागळे, प्रियंका पवार, तेजस्विनी पाखरे व इतर यांनी तिसरे स्थान पटकावले. पुणे ग्रामीण संघाला चार सुवर्ण, नऊ रजत व नऊ कांस्यपदक मिळवत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पेंचाक सिलाट हा इंडोनेशियन मार्शल आर्ट प्रकारचा खेळ असून, या खेळाचा प्रसार होण्यासाठी किशोर येवले प्रयत्न करत आहेत. या स्पर्धेत विजयी झालेल्या संघाची व खेळाडूंची हरियाणा व जम्मू कश्मीरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
पेंचाक सिलाट शाळा स्तरावर होण्याची आशा
पेंचाक सिलाट या खेळाला भारतीय क्रीडा मंत्रालयाने मान्यता देत राखीव नोकर भरतीसाठी हा खेळ समाविष्ट केला आहे. राज्य सरकारच्या वतीने आपल्या शालेय स्तरावर क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणेद्वारे शालेय शिक्षण व क्रीडा विभागकडे प्रस्ताव पाठवला असून, काही दिवसांनी हा खेळ सर्व शाळा स्तरावर खेळला जाणार आहे.