बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा तीन जण कोरोनाबाधीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 12:06 PM2020-06-17T12:06:34+5:302020-06-17T12:06:51+5:30
तीन कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही १३३ वर पोहोचली आहे.
बुलडाणा/मलकापूर: जिल्ह्यात मंगळवारी तीन कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही १३३ वर पोहोचली आहे. यात हॉटस्पॉट बनलेल्या मलकापूर शहरात एक, गेल्या काही दिवसापासून निरंक असलेल्या जळगाव जामोदमध्येही एक आणि मेहकर तालुक्यातील डोणगावमधील एका महिला रुग्णाचा समावेश आहे.
अकोला येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या चार अहवालांपैकी चार अहवाल १६ जून रोजी प्राप्त झाले. त्यापैकी तीन अहवाल हे पॉजिटिव्ह आले तर एक अहवाल निगेटीव्ह आला.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये जळगाव जामोद येथील ५६ वर्षीय पुरुष असून मलकापूरातील बहापुरा येथील २४ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आहे. डोणगाव येथील बाधीत महिलेचेही वय २० आहे.
जळगाव जामोदमधील द्वारगानगर भाग सील करण्यात आला असून आजपर्यंत जळगाव जामोदमध्ये तीन रुग्ण बाधीत सापडलेले आहेत. पैकी एकाचा मृत्यू झाला होता.
बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत ८१ कोरोना बाधीत व्यक्ती बऱ्या झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या ४७ रुग्ण कोरोना बाधीत असून त्यांच्यावर बुलडाणा, खामगाव आणि शेगाव येथील आयसोलेशन कक्षात उपचार करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १,८७३ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता १३३ झाली असून पैकी पाच जणांचा मृत्यू झालेला आहे. अकोला येथील प्रयोग शाळेमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या स्वॅब नमुन्यांपैकी २५ अहवालांची प्रतीक्षा आहे.
जळगावमध्ये ही एक रुग्ण
जळगाव जामोद : द्वारकानगर भागातील व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे.पांढºया पेशी कमी झाल्याने व ताप आल्याने खासगी रुग्णालयात उपचारानंतर त्यास ग्रामीण रुग्णालय व तेथून खामगावला पाठवले होते. १६ जून रोजी त्यांचा अहवाल पॉजिटिव्ह आला. त्यांच्या कुटुंबियांना क्वारंटीन करण्यात आले आले आहे.
काही रुग्णांना सुटी होण्याची शक्यता
मलापूर शहरातील आणखी तीन रुग्णांना १७ जून रोजी सुटी होण्याची शक्यता आहे. हे रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी दिल्या जाणार आहे. त्यानंतर रुग्णालयात मलकापूरमध्ये दहा जून नंतर सापडलेले रुग्णच राहतील.