बुलडाणा जिल्ह्याची काेराेनामुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 10:56 AM2021-06-15T10:56:15+5:302021-06-15T10:56:28+5:30

Buldana district on the way to Corona Free : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून, अनेक तालुक्यात रुग्णसंख्या घटली आहे़.

Buldana district on the way to Corona Free | बुलडाणा जिल्ह्याची काेराेनामुक्तीकडे वाटचाल

बुलडाणा जिल्ह्याची काेराेनामुक्तीकडे वाटचाल

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून, अनेक तालुक्यात रुग्णसंख्या घटली आहे़.  रविवारी जिल्ह्याचा पाॅझिटिव्ही रेट एक टक्क्यांपेक्षाही कमी हाेता़   साेमवारी केवळ ५५ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला़  दरम्यान, साेमवारपासून जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आल्याने बाजारात चैतन्य आले हाेते़. 
मार्च महिन्यात जिल्ह्यात काेराना संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढला हाेता़.  त्यामुळे, एप्रिलपासून जिल्ह्यात विविध निर्बंध लावण्यात आले हाेते़  गत वर्षीपासून निर्बंधामुळे व्यावसायिक संकटात सापडलेले आहेत़  बुलडाणा शहरामध्ये अनेक व्यावसायिक आठवडी बाजारात दुकाने लावतात़ काेराेना संसर्ग वाढल्याने आठवडी बाजारांवर बंदी आहे़  गत दाेन ते अडीच महिने आठवडी बाजारासह इतर दुकाने बंद असल्याने व्यापारी संकटात सापडले आहेत़  गत काही दिवसांपासून जिल्ह्याचा पाॅझिटिव्ही रेट कमी हाेत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहे़  १४ जूनपासून बुलडाणा जिल्ह्या लेव्हल एकमध्ये आल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले असून, सर्वच दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे़  त्यामुळे साेमवारी बाजारात चैतन्य आले हाेते.

Web Title: Buldana district on the way to Corona Free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.