बुलडाणा : दूध पिऊन नववर्षाचे स्वागत; व्यसनमुक्तीचा दिला संदेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:49 PM2018-01-01T23:49:47+5:302018-01-01T23:50:58+5:30
बुलडाणा: पाश्चात्त्य संस्कृतीने नववर्षाची स्वागत करण्याची परंपरा आजच्या युवा पिढीमध्ये रुजत आहे. ती परंपरा मोडीत काढत देशाभिमान बाळगत शिवसंग्राम संघटनेने गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण राज्यामध्ये व्यसनमुक्तीचा संदेश देण्याकरिता दारू पिणार्या युवकांकरिता दूध पिऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा संदेश देणारा उपक्रम राबविल्या जात आहे. त्या अनुषंगाने ३१ डिसेंबर रोजी शिवसंग्राम संघटनेच्यावतीने स्थानिक पत्रकार भवन परिसरात युवकांना दूध वाटप करून व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क

आज देशातील युवा पिढी पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करून व्यसनांकडे वळत आहे. दारू, सिगारेटसारख्या मादक पदार्थांचे सेवन करून युवा पिढी व्यसनांच्या वाटेवर जात आहेत. अशा युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्याचा संकल्प शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी घेतला असून, संपूर्ण राज्यभर त्यांनी शिवसंग्राम संघटनेच्यावतीने ठिकठिकाणी युवकांनी नवीन वर्षाचे स्वागत दूध पिऊन करावे व दारूसारख्या व्यसनापासून दूर राहावे, असा संदेश देणारा दूध वाटपाचा कार्यक्रम घेतला. त्या अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातसुद्धा गेल्या दोन वर्षांपासून शिवसंग्राम संघटना हा अभिनव उपक्रम राबवित आहे. शिवसंग्राम संघटनेचे शहर उपाध्यक्ष गणेश भोसले यांनी नवीन वर्षाच्या स्वागताला व्यसनमुक्तीचा संदेश देण्याच्या उद्देशाने ३१ डिसेंबरला दूध वाटपाचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला पदाधिकार्यांनी सर्मथन देत प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. ३१ डिसेंबरला सकाळी ११ वाजता पत्रकार भवन परिसरात अनेकांना दूध वाटप करून नवीन वर्षाचे स्वागत करताना दारू नव्हे तर दूध प्या, असा संदेश दिला. यावेळी सुमारे दोनशे जणांनी दूध पिऊन नवीन वर्षाचे स्वागत दारूच्या धुंदीत नव्हे तर शुद्धीत करण्याचा संकल्प केला. अमरावतीचे खा. आनंदराव अडसूळ यांचे स्वीय सहायक सुनील भालेराव, शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गायकवाड, डॉ. राजेश्वर उबरहंडे, डॉ. आशीष खासबागे, डॉ. शरद काळे, डॉ. सचिन किनगे, डॉ. जुबेर बागवान, डॉ. रामदास भोंडे, राजेश हेलगे, पत्रकार अजय बिलारी, चंद्रकांत बर्दे, अँड. हरिदास उंबरकर, संजय जाधव, सुधीर देशमुख, युवराज वाघ, संदीप वंत्रोले, नीलेश राऊत, विजय चोपडे, शहर उपाध्यक्ष गणेश भसले, संदीप सपकाळे, गणेश सोनुने, राहुल राऊत, अंकुश गायकवाड, अमृत पंडित, मंगेश राजपूत, अमोल देशपांडे, सुरपाटने, शशिकांत भालेराव यांच्यासह असंख्य युवक उपस्थित होते.