बुलडाणा : स्वाभिमानी संघटनेचा अपर जिल्हाधिकार्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:19 AM2018-02-03T00:19:59+5:302018-02-03T00:20:14+5:30
बुलडाणा: शासनाने खडकपूर्णा प्रकल्प उपसा सिंचन प्रकल्पाकरिता शेतकर्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या आहेत; परंतु आजपर्यंत शेतकर्यांच्या ज्या जमिनी अधिग्रहित केल्या आहेत, त्याचा योग्य मोबदला शेतकर्यांना मिळाला नाही. त्यामुळे शेतकर्यांना भूसंपादन अधिनियम २0१४ मधील तरतुदीनुसार मोबदला देण्यात यावा, या मागणीसाठी १ फेब्रुवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकार्यांना घेराव घालून आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क

शासनाने ज्या शेतकर्यांच्या जमिनी भूसंपादन विभागामार्फत संपादित केल्या आहेत, त्या शेतकर्यांना सरकारने त्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यासाठी चार पट मोबदला देण्याच्या अधिसूचना जाहीर केल्या होत्या.
आजपर्यंत शेतकर्यांच्या जमिनी अधिग्रहित झाल्या आहेत; परंतु आजपर्यंत शेतकर्यांना त्यांच्या जमिनीचा भूसंपादन अधिनियम २0१४ च्या तरतुदीनुसार मोबदला मिळाला नाही. चिखली तालुक्यातील देऊळगाव धनगर, येवता व कोनड यांसह अनेक गावातील शेतकर्यांच्या जमिनी खडकपूर्णा पाटात गेल्याने शेतकर्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.
देऊळगाव धनगर येथील शेतकरी शासनाच्या नवीन भूसंपादन अधिनियम सन २0१४ नुसार मोबदला मिळण्यास पात्र असतानासुद्धा त्यांना वाढीव मोबदला मिळाला नाही. म्हणून शासनाने याकडे लक्ष देऊन चिखली तालुक्यातील देऊळागाव धनगर, येवता व कोनड यासह अनेक गावातील शेतकर्यांना भूसंपादनाच्या नविन तरतुदीनुसार वाढीव मोबदला देण्यात यावा, अन्याथा स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल असा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन, चिखली तालुकाध्यक्ष भरत वाघमारे, गजानन घुबे यांनी दिला आहे.
शेतकर्यांना भूसंपादन अधिनियम २0१४ मधील तरतुदीनुसार मोबदला मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकार्यांना घेराव घालून आंदोलन केले.
यावेळी शेख रफिक, शेख करीम, हरिभाऊ उबरहंडे, अमोल मोरे, महेंद्र जाधव, नारायण घुबे, विष्णू घुबे, द्वारका घुबे, सुगदेव घुबे, समाधान घुबे, अनंथा घुबे, जनार्धन घुबे, गणेश घुबे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.