बुलडाणा : अखेर नाफेडच्या तूर खरेदीस मुदतवाढ; शेतकर्यांना दिलासा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 11:31 PM2018-04-24T23:31:26+5:302018-04-24T23:31:26+5:30
मलकापूर : नाफेडच्या तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढ मिळाल्याची माहि ती आहे. जिल्हा मार्केटींग फेडरेशनने यास दुजोरा दिला आहे. आजपासूनच तूर खरेदीची बंद पडलेली प्रक्रिया सुरू होणार असल्याने मलकापुरसह जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. ‘लोकम त’ने २२ एप्रिल रोजी शेतकर्यांच्या अडचणींवर लक्ष वेधणारे वृत्त प्रकाशित केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : नाफेडच्या तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढ मिळाल्याची माहिती आहे. जिल्हा मार्केटींग फेडरेशनने यास दुजोरा दिला आहे. आजपासूनच तूर खरेदीची बंद पडलेली प्रक्रिया सुरू होणार असल्याने मलकापुरसह जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. ‘लोकमत’ने २२ एप्रिल रोजी शेतकर्यांच्या अडचणींवर लक्ष वेधणारे वृत्त प्रकाशित केले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, नाफेडच्यावतीने जिल्हा मार्केटींग फेडरेशन व व्ही.सी.एम.एस.मार्फत तूर खरेदी करण्यात येते. त्यांच्या उ पलक्ष्य सब एजन्सी म्हणून तालुका खरेदी-विक्री संघ काम करते. या हंगामातील शासनाची तूर खरेदी १८ एप्रिल रोजी बंद करण्यात आल्याने हजारो शेतकरी हवालदिल झाले होते.
मलकापूर तालुक्यातील सुमारे ५0 हजार क्विंटल तूर शेतकर्यांच्या घरातच आहे. पेरण्या येऊन ठेपल्या असताना त्यांच्या तयारीसाठी पैशाची गरज अस ताना तूर खरेदी बंद झाली. त्यामुळे ३ हजारावर शेतकरी अडचणीत आले होते. त्यावर लक्ष वेधणारे वृत्त ‘लोकमत’ ने २२ एप्रिल रोजी प्रकाशित केले. २३ एप्रिल रोजी शासनाने तूर खरेदी प्रक्रियेला १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा मार्केट भंग अधिकारी पी.एस.शिंगणे यांनी या माहितीस दुजोरा दिला व तशा सूचना जिल्हाभर देणार असल्याचे ‘लोकम त’शी बोलताना सांगितले. जिल्हा पणन व्यवस्थापक संदीप पेठकर यांनीही त्याविषयी सकारात्मक बाजू घेऊन आमच्याकडे सूचना येतील, असे सांगि तले. त्यामुळे एकंदरीत परिस्थितीत मागील काळात बंद पडलेली शासनाची तूर खरेदी सुरू होणार, या वृत्तानेच मलकापूरसह हजारो शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे; मात्र १५ मेपर्यंतची मुदतवाढ पुरेशी नसल्याने त्यात आणखी कालावधी वाढवावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
तुरीचे चुकारेही तत्काळ द्या!
बर्याच शेतकर्यांनी तूर विकली आहे; मात्र अद्याप त्यांना चुकारे मिळाले नाहीत. शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडले असून, तत्काळ ही र क्कम अदा करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. जेणेकरून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांना खरिपाची पेरणी करण्यासाठी मदत होऊ शकेल. लोकप्रतिनिधींनीसुद्धा या प्रकाराचा पाठ पुरावा प्रशासनाकडे करणे गरजेचे झाले आहे.