बुलडाणा: सहकार विद्या मंदिरचे चार खेळाडू व्हीसीए प्रशिक्षणासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 02:03 PM2018-03-28T14:03:12+5:302018-03-28T14:03:12+5:30
बुलडाणा : स्थानिक सहकार विद्या मंदिर येथील चार युवक खेळाडूंची निवड विदर्भ क्रिकेट संघटना नागपूरच्या वतीने करण्यात आली.
बुलडाणा : स्थानिक सहकार विद्या मंदिर येथील चार युवक खेळाडूंची निवड विदर्भ क्रिकेट संघटना नागपूरच्या वतीने करण्यात आली.
१६ वर्षाखालील खेळाडूत अविष्कार जाधव तर १४ वर्षाखालील खेळाडूत शर्जिल शेख, आयुष देशमुख व यश तरमळे यांची नागपूर येथे झालेल्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली होती. नागपूर येथे झालेल्या प्रशिक्षण शिबिरात अमरावती विभागातून अमरावती येथील एक, अकोलाचे तीन तर बुलडाणाच्या एकट्या सहकार विद्या मंदिरचे चार खेळाडू निवडल्या गेले. त्यांना प्रशिक्षक राजू ढाले यांचे नियमित मार्गदर्शन मिळत आहे. सहकार विद्या मंदिरच्या अध्यक्षा कोलताई झंवर यांनी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधामुळे हे शक्य असल्याचे प्रशिक्षक ढाले यांनी सांगितले. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या वतीने बुलडाणा येथे गत सत्रात वारंवार आयोजित विविध वयोगटातील स्पर्धेमुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंना सामने खेळण्याची संधी यामुळे मिळाली आहे. खेळाडंूच्या निवडीबाबत जिल्हा क्रिकेट समितीचे मोहम्मद साबीर, राहुल जाधव, चंद्रकांत साळुंके, इम्रान खान तसेच प्राचार्य अलगर स्वामी यांनी कौतूक केले.