बुलडाणा: आठवीची विद्यार्थीनी झाली एक दिवसाची जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 01:56 PM2020-03-03T13:56:54+5:302020-03-03T13:57:08+5:30

जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता आठवीमधील पूनम देशमुखला एक दिवस जिल्हाधिकारी होण्याचा मान दिला गेला.

Buldana: a girl student became one day collector | बुलडाणा: आठवीची विद्यार्थीनी झाली एक दिवसाची जिल्हाधिकारी

बुलडाणा: आठवीची विद्यार्थीनी झाली एक दिवसाची जिल्हाधिकारी

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जागतिक आंतरराष्ट्रीय महिला दिन ८ मार्चनिमित्त महिला सशक्तीकरणाचा अभिनव उपक्रम जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी हाती घेतला आहे. २ मार्चला पाडळी येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता आठवीमधील पूनम देशमुखला एक दिवस जिल्हाधिकारी होण्याचा मान दिला गेला.
हा सांकेतिक प्रभार पूनम देशमुखला सोपवून सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसवले तेव्हा तिच्यासमोर जिल्हाधिकारी सुमन चंद्रा व प्रशासकीय अधिकारी बसले होते. यावेळी पूनमने स्त्री शिक्षणासाठी भविष्यात प्रयत्न करण्याचा विश्वास व्यक्त केला. प्रशासन लोकाभिमुख व्हावे, प्रशासकीय कामाला सामाजिकतेची जोड मिळावी, या साठी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा नवनवे प्रयोग राबवित आहेत. त्यांनी महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत २ ते ८ मार्च दरम्यान महिला सप्ताह राबविण्याचे ठरवीले. त्या अनुषंगाने गुणवत्ता प्राप्त विद्याथींनीना एक दिवसासाठी जिल्हाधिकारी बनविण्याचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. पाडळी गावातील पूनम देशमूखने जिल्हाधिकारी होण्याचा पहिला मान आज मिळविला. तिला इयत्ता ८ वीत सर्वाधिक ९८ टक्के गुण मिळाले आहेत. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


आमदारांचे एक दिवसाच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
आज महिला जागतिक दिना निमित्य माननीय जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी पूनम देशमुख यांना जिल्हाधिकारी खुर्चीचा मान दिला होता. तेव्हा पूनम देशमुख यांना छत्रपती संभाजी महाराज जयंती विषयी आ. संजय गायकवाड यांनी निवेदन दिले.


‘मलाही कलेक्टर व्हायचयं..!
माझं नाव पुनम प्रल्हाद देशमुख. जिल्हा परिषदेच्या पाडळी ता. बुलडाणा शाळेची इयत्ता आठवी मधील विद्यार्थीनी. आज माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा दिवस. मला जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या संकल्पनेमुळे थेट जिल्हाधिकारी व्हायचा मान मिळाला. मी आज दिवसभरात प्रशासनाच्या कामकाजाचा अनुभव घेणार आहे, असे मत एका दिवसासाठी जिल्हाधिकारी बनलेल्या पुनम प्रल्हाद देशमुख यांची.

Web Title: Buldana: a girl student became one day collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.