बुलडाणा : कृषी पंप देयक दुरुस्तीसाठी आता स्वतंत्र शिबिरे; यंत्रणेला निर्देश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 01:02 AM2017-12-30T01:02:59+5:302017-12-30T01:03:17+5:30
बुलडाणा : कृषी पंपधारकांकडे असलेल्या थकित देयके भरण्यासाठी तथा त्यांच्या दुरुस्तीसाठी आता महावितरणने फिडरनिहाय देयक दुरुस्ती शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेतंर्गत तीन हजार किंवा पाच हजार रुपये भरून कृषी ग्राहक सहभागी झाला असेल, तर पहिल्या हप्त्याची मुदत संपेपर्यंत त्याचा वीज पुरवठा खंडित करू नये, असे निर्देश महावितरणने २८ डिसेंबर रोजीच काढलेल्या परिपत्रकात दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

सोबतच ज्या कृषी ग्राहकांनी सवलतीच्या दरानेसुद्धा रक्कम भरली नसेल, अशा थकबाकीदार कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा नियमानुसार खंडित करण्यात येणार असल्याचेही संबंधित पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. कृषी ग्राहकांच्या वीज देयकाची दुरुस्ती करताना ग्राहकाचा मंजूर तसेच जोडलेला विद्युत भार, मीटरवरील वाचन, फिडरवरील वीज वापराचा निर्देशांक, वापराचे तास संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयाने विचारात घेणे क्रमप्राप्त असल्याचेही महावितरणचे म्हणणे आहे. बुलडाणा जिल्ह्यातील दीड लाख वीज ग्राहकांकडे नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर ८१८ कोटी रुपयांची थकबाकी होती. त्यातील ५७ हजार ५८६ कृषी पंपांना वीज पुरवठा घेतल्यापासून देयकच भरण्यात आले नसल्याचे जनसंपर्क विभागाचे म्हणणे होते. थकबाकी भरणार्या कृषी पंपांची वीज खंडित होणार नाही; परंतु ज्यांनी थकबाकी भरलीच नाही, अशांची वीज खंडित करण्यात येणार आहे. सोबतच शेती पंपांची वीज खंडित होणार नाही, अशा आशयाच्या वृत्ताचे महावितरणे खंडन केले आहे.
तर तीन दिवसांत रोहित्र बदलून मिळणार!
वीज रोहित्रावरील सर्व कृषी पंपधारकांनी देयकाचा भरणा केल्यास नादुरुस्त वीज रोहित्र तीन दिवसांत बदलून देण्याबाबत महावितरणने निर्देशित केले आहे. कृषी पंपांची वीज देयके दुरुस्ती आणि वसुलीच्या कामात दिरंगाई आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचार्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेतही महावितरणे २८ डिसेंबर रोजीच दिले आहेत.