बुलडाणा जनता कर्फ्यू : दुकाने बंद; जनता रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 11:32 AM2020-09-19T11:32:04+5:302020-09-19T11:32:29+5:30

बुलडाणा, लोणार, खामगावसह जिल्ह्यातील बहुतांश भागात असेच चित्र दिसून आले.

Buldana Janata Curfew: Shops closed; People on the streets | बुलडाणा जनता कर्फ्यू : दुकाने बंद; जनता रस्त्यावर

बुलडाणा जनता कर्फ्यू : दुकाने बंद; जनता रस्त्यावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा सहा हजारांच्या घरात पोहचत असतानाच संक्रमणाची व्याप्ती वाढण्याची भीती व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर १८ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर दरम्यान जनता कर्फ्यु पुकारण्यात आला आहे. त्यास जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळाला. एकीडे दुकाने बंद होती तर लोक मात्र रस्त्यावर सर्रास फिरत असल्याचे चित्र दिसून आहे.
बुलडाणा, लोणार, खामगावसह जिल्ह्यातील बहुतांश भागात असेच चित्र दिसून आले. त्यातच जनता कर्फ्यु रद्द झाल्याच्या अफवा दोन दिवसापासून जिल्ह्यात सोशल मिडीयावर फिरत होत्या. त्याचाही विपरीत परिणाम जनता कर्फ्युच्या करण्यात आलेल्या आवाहनावर झाला.
दुसरीकडे मात्र रस्त्यावर अकारण फिरणाऱ्या तथा मास्कचा वापर न करणाºया अनेकांवर पोलिस प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली. त्याचा येत्या काळात नक्कीच सकारात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ३० सप्टेंबर रोजी जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा नऊ हजारांच्या घरात जाण्याची शक्यता आयसीएमआरने व्यक्त केली आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांचीही संख्या जवळपास १७८ च्या घरात जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एकट्या आॅगस्ट महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात दोन हजार पेक्षा अधिक रुग्णांची भर पडली होती तर वर्तमान स्थितीत कधी दीडशे तर कधी दोनशे कोरोना बाधीत व्यक्ती आढळून येत होते. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून तथा व्यापाºयांकडून प्राप्त झालेल्या सुचनांचा आधार घेत जिल्हत जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी १५ सप्टेंबर रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सुचनांच्या आधारावर जिल्ह्यात जनता कर्फ्यु १८ ते २ आॅक्टोबर दरम्यान राहण्याचे संकेत दिले होते. त्यानुषंगाने हा जनता कर्फ्यु सध्या पुकारण्यात आला आहे. यामध्ये जिवनावश्यक वस्तू, किरणा दुकान, रुग्णालय, मेडीकल स्टोअर्स, दुधाला सुट देण्यात आलीआहे. बुलडाण्यात सकाळी फारसी गंभीरता नव्हती मात्र दुपानंतर प्रत्यक्ष जनता कर्फ्युला प्रतिसाद मिळू लागला.

Web Title: Buldana Janata Curfew: Shops closed; People on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.