वकिलांचा कामकाजापासून अलिप्त राहण्याचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 09:50 PM2017-08-21T21:50:42+5:302017-08-21T21:50:42+5:30
बुलडाणा पोलीस स्टेशनमध्ये कॉलर पकडून बुलडाणा बारचे सदस्य अॅड. प्रकाश गायकवाड यांना अन्यायकारक वागणूक दिली. या घटनेच्या निषेध नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : बुलडाणा बारचे सदस्य अॅड. प्रकाश गायकवाड यांच्यासोबत बुलडाणा पोलीस स्टेशनमध्ये कॉलर पकडून अन्यायकारक वागणूक दिली. या घटनेच्या निषेधार्थ १८ आॅगस्ट रोजी
शुक्रवारला वकील संघ सिंदखेडराजा यांनी कामकाजापासून अलिप्त राहण्याचा ठराव घेऊन निषेध नोंदविला. तसेच वकील हे समाजातील एक अविभाज्य घटक असून, वकिलांवर होणाºया
अन्यायाविरुद्ध प्रभावी कायदा व्हावा, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार सिंदखेडराजा यांना देण्यात आले.
यावेळी सिंदखेडराजा वकील संघाचे अध्यक्ष अॅड.ज्ञानेश्वर जायभाये, उपाध्यक्ष अॅड.हाडे, सचिव अॅड.सोनकांबळे, ज्येष्ठ विधीज्ञ अॅड.एकनाथ ठाकरे, अॅड. निशिकांत राजे जाधव, अॅड. मंगळवेढे,
अॅड.राजेंद्र ठोसरे, अॅड. राहुल विघ्ने, अॅड.व्ही.बी.पवार, अॅड. जी. जी. कंकाळ, अॅड.आर.एन. मेहेत्रे, अॅड. मोहसिन शेख, अॅड.जी. व्ही. मुंढे, अॅड. के. जी. पवार, ई. जी. ए. कोरडे, अॅड. एस.
एन.उबाळे आदी हजर होते.