बुलडाणा : किक बॉक्सींग स्पर्धेमध्ये सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 01:46 PM2017-12-05T13:46:35+5:302017-12-05T13:49:07+5:30
बुलडाणा : नेहमी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये अव्वल राहणाºया स्थानिक सैनिकी शाळेच्या बारा विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर होणाºया किक बॉक्सींग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
बुलडाणा : नेहमी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये अव्वल राहणाºया स्थानिक सैनिकी शाळेच्या बारा विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर होणाºया किक बॉक्सींग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शेगाव येथे २६ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय किक बॉक्सींगचे आयोजन जिल्हा किक बॉक्सींग संघटनेच्यावतीने करण्यात आले होते. यामध्ये स्थानिक राजीव गांधी सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी देखील वेगवेगळ्या वयोगटामध्ये सहभाग नोंदवून नेत्रदिपक कामगिरी करुन सुवर्ण व रजत पदके पटकावली व राज्यस्तरावर होणाºया स्पर्धेसाठी आपली जागा निश्चीत केली. यामध्ये यशकुमार चेके, गोपाल आघाव, ओमकुमार राठोड, शुभम दोडे, राज राठोड, शुभम वाघ, संकेत सरोदे, सुरज पसरटे हे सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. तर साहिल घुगे, यश पाटील, गोपाल राऊत, नागेश धोटे यांनी रजत पदके पटकाविली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांचे प्रशिक्षक सिद्धार्थ सरकटे यांनी परिश्रम घेऊन प्रशिक्षण दिले. राज्यस्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ माळी, कोषाध्यक्ष विद्या माळी, प्रशासकीय अधिकारी अशोक राऊत, मुख्याध्यापक रविंद्र पडघान, उपमुख्याध्यापक शैलेश वारे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले. (प्रतिनिधी)