बुलडाणा: न्युमोनिया झालेल्या ६८ बकऱ्यांचे मॉनिटरींग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 05:25 PM2020-04-22T17:25:09+5:302020-04-22T17:29:04+5:30
आजारी बकऱ्यांना अन्य बकऱ्यांपासून वेगळे ठेवण्याचा सल्लाही पशुसंवर्धन विभागाच्या चमुने दिला आहे.
बुलडाणा: जळगाव जामोद तालुक्यातील चाळीस टपरी आदीवासी पाड्यावरील आजारी बकऱ्यांची जिल्हा पशुसंवर्धन विभागाने तपासणी केली असून त्यांचे स्वॅब नमुने, रक्त जल नमुने घेण्यात आले आहेत. दरम्यान, काही दिवसांसाठी या आजारी बकऱ्यांना अन्य बकऱ्यांपासून वेगळे ठेवण्याचा सल्लाही पशुसंवर्धन विभागाच्या चमुने दिला आहे. या आदिवासी पाड्यातील ६८ बकऱ्यांपैकी एका बकरीचा मृत्यू झाला असून आठ बकऱ्यांमध्ये कॅथॅजिअस, कॅप्सीन फ्ल्यूरोनिमोनिया अर्थात उन्हाळी सर्दीची लक्षणे आढळून आली आहेत. २० आणि २१ एप्रिल दरम्यान या बकºयांवर उपचारही करण्यात आले असून त्यांच्यामध्ये सुधारणा होत असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. जी. बोरकर यांनी सांगितले.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये बकºयांना न्युमोनिया सदृश्य आजार झाल्यामुळे आदिवासींमध्ये घबराट निर्माण झाली होती. यासंदर्भात बुलडाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून या भागातील पशुधनाची तापसणी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार २० व २१ एप्रिल रोजी डॉ. तळेकर आणि सहाय्यक आयुक्त डॉ. जयसवाल यांच्या नेतृत्वात पशुसंवर्धन विभागाच्या चमुने चाळीस टपरी पाड्यावरील ६८ बकºयांची तपासणी केली. त्यावेळी त्यामध्ये आठ बकºयांमध्ये सीसीपीपी अर्थात कॅथॅजिअस, कॅप्सीन फ्ल्यूरोनिमोनियाची लक्षणे आढळून आली. दोन दिवस उपचार केल्यांतर या बकºयांना असलेला ताप सर्वसाधारण असल्याचे तपासणीत समोर आले. दरम्यान, एका बकरीचा मृत्यू झाला आहे.
संसर्ग टाळण्यासाठी विलगीकरण
या बकºयांना झालेला उन्हाळी सर्दीचा हा संसर्ग अन्य बकºयांना होऊ नये म्हणून त्या तीन दिवस वेगळ््या बांधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सोबतच गोठ्यामध्ये हवा खेळती राहील, अशा पद्धतीने व्यवस्था करावी, आजारी बकºयांना सकस आहार द्यावा, स्वच्छ पाणी पाजावे, जंतू निर्मूलन करावे, अशा सुचना व मार्गदर्शन करण्यात आले आहे.
तीन दिवस पथक गावातच
या बकºयांचे मॉनिटरींग करून तपासणी करण्यासाठी तीन दिवस पशुसंवर्धन विभागाचे पथक या आदीवासी पाड्यावरच राहणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले. सोबतच बकºयांवर उपचार सुरू असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.